Sakal Lok Sabha Election 2024 Survey: BJP VS Maha Vikas Aghadi Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Election 2024 Survey: देशात भाजपला पहिली पसंती, मात्र महाराष्ट्रात वेगळा निकाल; सर्वेक्षणातून समोर आली टेन्शन वाढवणारी आकडेवारी

Sakal Maharashtra Lok Sabha Election 2024 Survey: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाने 'कल महाराष्ट्राचा' हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात राज्यात भाजपला धक्का बसताना दिसत आहे.

Satish Kengar

Sakal Lok Sabha Election 2024 Survey:

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाने 'कल महाराष्ट्राचा' हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात राज्यात भाजपला धक्का बसताना दिसत आहे. या सर्वेक्षणात राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये राजकीय हवा कोणाच्या बाजूने आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्नन करण्यात आला आहे. ज्यात राज्यातील मतदार मविआच्या बाजूने कल देताना दिसत आहे.

कसं करण्यात आलं सर्वेक्षण?

सकाळच्या सहायक संपादिका शीतल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातून एकूण ३४,९७८ लोकांची मते या सर्व्हेक्षणादरम्यान जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणासाठी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ विधानसभा निहाय विभागून यादृच्छिक पद्धतीने नमुना निवड (Random sampling) करण्यात आली आहे. यामध्ये लिंग, वय, जात, धर्म, कुटुंबाची आर्थिक स्थिती, वेगवेगळे उत्पन्न गट, सरकारी योजनांचे लाभार्थी, नव मतदार असे निकष निश्चित केले होते. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे प्रश्न यावेळी विचारण्यात आले होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेची कोणत्या पक्षाला पसंती?

सर्वेक्षणात लोकसभा आगामी निवडणुकीत (२०२४) मतदान करताना आपण पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यात यात 33.6 टक्के लोकांनी भाजपला पसंती दर्शवली आहे. तर तर कााँग्रेसला 18.5 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाला 12.6 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस (अहजत पवार) 3.9, शिवसेना (एकनाथ शिंदे ) 4.9 आणि शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 12.5 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.  (Latest Marathi News)

यातच मनसे 1.4 टक्के, शेकाप 0.3 टक्के, एमआयएम 0.6 टक्के, स्वाभिमानी शेतकरी पक्ष 0.4 टक्के, प्रहार 0.3 टक्के वंचित 0.3 टक्के, केसीआर यांच्या पक्षाला 0.2 टक्के, आम आदमी पक्षाला 0.5 टक्के, अपक्ष 1.3 टक्के आणि इतर 5 टक्के निवड करणार असल्याचं सांगितलं आहे.

Sakal Lok Sabha Election 2024 Survey

राज्यतील जनतेचा कल कोणाच्या बाजूने?

या सर्वेक्षणात मतदान करताना आपले प्राधान्य कोणाला असेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) 40.3 टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे. तर इंडिया / महाविकास आघाडीला 45.7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर तर 10.3 टक्के लोकांनी यापैकी कोणीही नाही, असं म्हटलं आहे.

आगामी निवडणुकीत कोणते मुद्दे लक्षात घेऊन मतदान करणार?

यामध्ये असाही प्रश्न विचारण्यात आला की, लोकसभा (२०२४) निवडणुकीला मतदान करताना आपण कोणत्या मुद्याला प्राध्यान्य देता? यात 21.4 टक्के लोकांनी पंतप्रधान पदाचा चेहरा म्हटलं आहे. तर 12.9 टक्के लोकांनी पक्ष, 8.1 टक्के लोक म्हणाली स्थानिक उमेदवाराची लोकप्रियता, 1.2 टक्के मतदार म्हणाले उमेदवाराची जात, 0.8 टक्के लोकांनी उमेदवाराचा धर्म, 11.6 टक्के लोकांनी नेत्यांनी केलेली कामे आणि 9.3 टक्के लोक म्हणाले पक्ष - विकास अजेंडा / जाहीरनामा आणि 3.1 लोक म्हणाले मतदारसंघात आलेला निधी. यातच 10.1 टक्के लोक म्हणाले, मतदारसंघात पूर्ण झालेली विकास कामे, 3.4 टक्के लोकांना हिंदुत्व हा मुद्दा महत्वाचा वाटतो, 9.6 लोक म्हणाले वरीलपैकी सर्व आणि 8.6 टक्के लोक म्हणाले सांगता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वडाळ्यातून सलग नवव्यांदा कालिदास कोलंबकर विजयी

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

SCROLL FOR NEXT