Lok Sabha Survey: राज्यात भाजप आघाडी घेणार की, मविआ बाजी मारणार? लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा कल कुणाकडे? सर्वेक्षणातून समोर आली माहिती

Sakal Lok Sabha Election 2024 Survey: आगामी लोकसभा अनुषंगाने सकाळ माध्यम समूहाने 'कल महाराष्ट्राचा' हे सर्वेक्षण केलं आहे. ज्यामध्ये राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये राजकीय हवा कोणाच्या बाजूने आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Sakal Lok Sabha Election 2024 Survey
Sakal Lok Sabha Election 2024 SurveySaam Tv
Published On

Sakal Lok Sabha Election 2024 Survey:

आगामी लोकसभा अनुषंगाने सकाळ माध्यम समूहाने 'कल महाराष्ट्राचा' हे सर्वेक्षण केलं आहे. ज्यामध्ये राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये राजकीय हवा कोणाच्या बाजूने आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2014 आणि 2019 मधील मोदी लाट अजूनही महाराष्ट्रात आहे का?

राज्यातील पक्षांमधील झालेल्या फाटाफुटीमध्ये लोकांचं काय मत आहे? तसेच आता निवडणूक झाली, तर कोणाला किती जागा मिळू शकतात हे यातून जाणून घेण्यात आलं आहे. कोणाला किती टक्के मतदान होऊ शकतं, याचा आढावाही या सर्वेक्षणातून घेण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sakal Lok Sabha Election 2024 Survey
Haryana CM: हरियाणाआधी या राज्यांमध्येही भाजपने बदलले होते मुख्यमंत्री, निवडणुकीत काय झाला होता फायदा?

कसं करण्यात आलं सर्वेक्षण?

सकाळच्या सहायक संपादिका शीतल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातून एकूण ३४,९७८ लोकांची मते या सर्व्हेक्षणादरम्यान जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणासाठी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ विधानसभा निहाय विभागून यादृच्छिक पद्धतीने नमुना निवड (Random sampling) करण्यात आली आहे. यामध्ये लिंग, वय, जात, धर्म, कुटुंबाची आर्थिक स्थिती, वेगवेगळे उत्पन्न गट, सरकारी योजनांचे लाभार्थी, नव मतदार असे निकष निश्चित केले होते. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे प्रश्न यावेळी विचारण्यात आले होते.  (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा कल कुणाकडे?

या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला की, केंद्र सरकारच्या कामावर आपण समाधानी आहात का? यावर ४०.४ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. तर ४४.५ टक्के लोकांनी नाही, असं उत्तर दिलं आहे. तर १५.१ टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं म्हटलं आहे.

Sakal Lok Sabha Election 2024 Survey
Rahul Gandhi In Nandurbar : शेतकरी आणि आदिवासी समाजासाठी राहुल गांधींची मोठी घोषणा; आमचं सरकार आलं तर...

लोकसभा आगामी निवडणुकीत (२०२४) मतदान करताना आपण पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल?

यात आणखी प्रश्न विचारण्यात आला की, लोकसभा आगामी निवडणुकीत मतदान करताना आपण पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल? यात ३३.६ टक्के लोकांनी भाजपची निवड करणार असल्याचं सांगितलं आहे. तर कााँग्रेसला १८.५ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाला १२.६ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस (अहजत पवार) ३.९, शिवसेना (एकनाथ शिंदे ) ४.९, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे १२.५ टक्के, मनसे १.४ टक्के, शेकाप ०.३ टक्के, एमआयएम ०.६ टक्के, स्वाभिमानी शेतकरी पक्ष ०.४ टक्के, प्रहार ०.३ टक्के वंचित ०.३ टक्के, केसीआर यांच्या पक्षाला ०.२ टक्के आम आदमी पक्षाला ०.५ टक्के, अपक्ष १.३ टक्के आणि इतर ५ टक्के निवड करणार असल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com