देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांकडून जागावाटपा संदर्भात बैठका घेतल्या जात आहेत. महायुती आणि आघाडीकडून विजयाचे दावे केले जात आहेत. त्याचवेळी एक धक्कादायक अहवाल समोर आलाय. या अहवालानुसार,राज्यातील मतदरांचा कल बदललेला दिसत आहे. सकाळा समुहाने केलेल्या सर्वेक्षणातून राज्यातील जनतेला पुन्हा तोच खासदार नकोय.(Latest News)
आगामी लोकसभा अनुषंगाने सकाळ माध्यम समूहाने 'कल महाराष्ट्राचा' हा सर्वेक्षण केला आहे. या सर्वेक्षणात मोठी बाब समोर आलीय. सर्वेक्षणानुसार यंदाची निवडणूक ही सर्व पक्षांसाठी आव्हानात्मक असणार आहे. मतदार २०१९ प्रमाणे मतदान करणार नाहीत. तसेच लोकांना तोच खासदार पुन्हा नकोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ समुहाने सकाळच्या सहायक संपादिका शीतल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातून एकूण ३४,९७८ लोकांची मते या सर्व्हेक्षणादरम्यान जाणून घेतली आहेत. यात अनेकांनी आपल्या विद्यमान खासदाराच्या कामगिरीवर संमिश्र प्रतिक्रिया दिलीय. जवळपास ५० टक्के मतदार खासदारांच्या कामगिरीवर नाराज आहेत. त्याचमुळे मतदारांना मागे निवडणून आलेला खासदार नकोय. पुन्हा तोच खासदार नको असल्याच्या मतावर ४९.८ टक्के मतदारांनी सहमती दर्शवलीय.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दमदार विजय मिळवला होता. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपने मोठा प्रचार केला होता, राष्ट्रवाद, राममंदिर, अर्टिकल ३७०, तिहेरी तलाक, अशा मुद्द्यांना हात घालत प्रचार केला होता. आता या मुद्द्यांमधील बऱ्याच गोष्टी भाजपने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे भाजप त्याचा उजाळा करत निवडणुकीचा प्रचार सुरू करेल. यासंदर्भातही सकाळच्या सर्वेक्षणात मतदारांना प्रश्न विचारण्यात आलाय.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही २०१९प्रमाणे मतदान केले जाणार का, असा प्रश्न नागरिकांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ५६ टक्के लोकांनी १९च्या लोकसभेप्रमाणेच मतदान करणार असल्याचं म्हटलंय. तर २४ टक्के लोकांनी त्याप्रमाणे मतदान करणार नसल्याचं म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.