Food Quality Check saam tv
महाराष्ट्र

Shirdi Temple: शिर्डीत साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ, कडक आणि बुरशी आलेल्या पेढ्यांची प्रसाद म्हणून विक्री

Food Quality Check: शिर्डी मंदिर परिसरातील काही प्रसाद विक्री केंद्रांवर निकृष्ट दर्जाचे, बुरशी लागलेले आणि माहितीविरहित पेढे विकले जात असल्याचा दावा समोर आला आहे. या प्रकारामुळे भाविकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

साईबाबांच्या शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मंदिर परिसरातील अनेक प्रसाद विक्री केंद्रांवर निकृष्ट दर्जाचे आणि संशयास्पद पेढे विकले जात असल्याचं एका पडताळणीत उघड झालंय. या प्रकारामुळे साईभक्तांमध्ये संताप आणि नाराजी व्यक्त केली जातेय.

शिर्डीत दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. याशिवाय वर्षभरात कोट्यवधी भक्त याठिकाणी येथे देतात. दर्शनानंतर अनेक जण मंदिर परिसरातील खासगी दुकानांतून प्रसाद म्हणून पेढे खरेदी करतात. मात्र या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढ्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होताना दिसतायत.

पडताळणीत असं आढळून आलं की, अनेक पेढ्यांच्या पॅकेटवर उत्पादनाची तारीख, वापरण्याची अंतिम तारीख (एक्सपायरी डेट) किंवा उत्पादकाची माहिती नमूद केलेली नाही. त्यामुळे हे पेढे नेमके कुठे तयार होतात, त्यांची क्वालिटी काय आहे आणि ते किती दिवसांपूर्वी बनवलंय याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती ग्राहकांना मिळत नाहीये.

याहून धक्कादायक बाब म्हणजे काही पॅकेटमधील पेढे अतिशय कडक झालेले असून काही ठिकाणी त्यांना बुरशी लागल्याचंही दिसून आलं. अशा पेढ्यांची विक्री प्रसादाच्या नावाखाली सुरू असल्याने भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या मते, हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र याकडे शिर्डी नगरपालिका तसंच अन्न आणि औषध प्रशासनाचं पुरेसं लक्ष नसल्याचा आरोप केला जातोय. संबंधित विभागांनी नियमित तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Maharashtra News Live Update: राहुल गांधींसह खासदार गांधी स्मृतीस्थळी दाखल

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

SCROLL FOR NEXT