Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

१ लिटर दूध, २ टेबलस्पून लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, ५०० मिली दूध (रबडीसाठी), साखर, वेलची पूड, केशर, पिस्ता आणि बदामाचे काप घ्या.

Angoori Rasmalai Recipe

छेना (पनीर) तयार करा

दूध उकळल्यानंतर त्यात लिंबाचा रस घालून फाडा. तयार झालेला छेना स्वच्छ कापडात गाळून थंड पाण्याने धुवा आणि अतिरिक्त पाणी काढून टाका.

Angoori Rasmalai Recipe

छोटे गोळे बनवा

छेना ८ ते १० मिनिटे मऊ होईपर्यंत मळा. त्याचे लहान, गुळगुळीत आणि भेगा नसलेले गोळे तयार करा.

Angoori Rasmalai Recipe

साखरेच्या पाकात शिजवा

एका भांड्यात पाणी आणि साखर उकळून पाक तयार करा. त्यात छेनाचे गोळे घालून १२ ते १५ मिनिटे झाकण ठेवून शिजवा. गोळे आकाराने दुप्पट होतील.

Angoori Rasmalai Recipe

रसमलाईचे दूध तयार करा

दुसरे दूध आटवत त्यात साखर, वेलची पूड आणि केशर घाला. दूध किंचित घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.

Angoori Rasmalai Recipe

गोळे दुधात घाला

साखरेच्या पाकातून गोळे काढून हलकेच दाबून अतिरिक्त पाक काढा. नंतर ते तयार केलेल्या रसमलाईच्या दुधात सोडा.

Angoori Rasmalai Recipe

गार करून सर्व्ह करा

अंगुरी रसमलाई २ ते ३ तास फ्रिजमध्ये थंड करा. सर्व्ह करताना बदाम-पिस्त्याचे काप आणि थोडे केशर घालून सजवा. थंडगार अंगुरी रसमलाईची चव अधिकच अप्रतिम लागते.

Angoori Rasmalai Recipe

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Yoga For Weight Loss | Saam Tv/ AI
येथे क्लिक करा