sai baba mandir will remain open 24 hrs on wednesday ram navami 2024 shirdi Saam Tv
महाराष्ट्र

Shirdi News: साईभक्‍तांसाठी आनंदाची बातमी; भाविकांसाठी बुधवारी साई मंदिर रात्रभर राहाणार खुले

Ram Navami 2024 : साई भक्तांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर भव्य असा पौराणिक देखावा साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसोडे

Shirdi :

रामनवमी उत्सव (ram navami 2024) निमित्त शिर्डी येथील साईबाबा मंदिर (shirdi sai baba temple) बुधवारी (ता. 17 एप्रिल) भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. यामुळे परगावहून आलेल्या भाविकांना साईबाबा यांचे दर्शन घेण्यास सुलभ हाेणार आहे. भाविकांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन साई संस्थान (sai sansthan) तर्फे करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

साई दरबारी साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवांपैकी रामनवमी हा महत्वाचा उत्सव मानला जातो. साईबाबा हयात असल्यापासून शिर्डीमध्ये हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ आजही ही परंपरा जाेपासत आहेत.

शिर्डीतील रामनवमी उत्सव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला जातो. साईंच्या शिर्डीत उद्यापासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात होत आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच 17 एप्रिल रोजी साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. या तीन दिवसीय उत्सव काळात साई संस्थानकडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या निमित्ताने साई भक्तांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर भव्य असा पौराणिक देखावा साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कमी खर्च, चांगली सोय! भारतातील सर्वात स्वस्त परवडणारे शहर कोणते?

Maharashtra Live News Update: जगदीप धनखड यांचे कॅमेरामॅनही गायब- प्रियंका चतुर्वेदी

Agriculture News : ऊस, द्राक्षाच्या पट्ट्यात कडधान्याचा पेरा; सर्वाधिक २४०० एकरांवर उडीदाची पेरणी

Maharashtra Politics : नकली नोटा, पथनाट्य, पत्ते खेळ आणि होम-हवन ; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात राज्यभर जनआक्रोश आंदोलन

Thane Mahapalika Bharti 2025: खुशखबर! ठाणे महानरपालिकेत सर्वात मोठी भरती; १७७३ रिक्त पदे; पगार १ लाखांपेक्षा जास्त; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT