Guhagar Bhaskar Jadhav vs Rajesh bendal Exit Poll Results 2024 saam tv
महाराष्ट्र

Saam Exit Poll : ठाकरे गटाची तोफ धडाडणार? गुहागर कोण जिंकणार? एक्झिट पोलचा अंदाज आला

Maharashtra Exit Poll : रत्नागिरीत गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना होणार आहे. आता यात भास्कर जाधव बाजी मारतात की राजेश बेंडल हे २३ तारखेला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.

Nandkumar Joshi

सचिन कदम, गुहागर

Maharashtra Exit Poll : शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत रत्नागिरीतील भास्कर जाधव हे आतापर्यंत सोबत राहिले आहेत. भास्कर जाधव हे विद्यमान आमदार आहेत. ठाकरे गटानं त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. आता शिंदे गटाकडून राजेश बेंडल हे रिंगणात आहेत. आता यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे २३ तारखेला निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

रत्नागिरीतलं गुहागर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेना (ठाकरे गट) विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा थेट सामना होत आहे. ठाकरे गटानं विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनाच रिंगणात उतरवलं. तर शिंदेंच्या शिवसेनेनं राजेश बेंडल यांना संधी दिली.

ही थेट लढत असली तरी मतदानानंतर घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भास्कर जाधव यांना मतदारांनी झुकतं माप दिल्याचं चित्र आहे. तेच येथील संभाव्य आमदार असण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीनं केलेल्या एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ठाकरे गटाची तोफ म्हणून भास्कर जाधव यांच्याकडे पाहिले जाते. एक्झिट पोलमध्ये जाधव यांचेच पारडे जड मानले जात आहे. आता ही तोफ विधानसभेत पुन्हा धडाडणार का? हे प्रत्यक्ष निकालाच्या दिवशीच समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Courtroom Drama: इमरान हाश्मीचा 'हक' पाहायला जायचा प्लॅन करताय? त्याआधी ओटीटीवर पाहा 'हे' कोर्टरूम ड्रामा चित्रपट

Maharashtra Live News Update: मरीन लाईन्स परिसरातील इमारतीला आग

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघे ताब्यात, हत्येची सुपारी देणारा बडा नेता कोण?

Ind vs Aus: भारताच्या धारदार गोलंदाजीसमोर बॅटिंग ढासळली; सिरीजमध्ये टीम इंडिया आघाडीवर

Bihar Election: उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव; वाहनांवर दगड, शेणफेक, बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न, मतदानावेळी तुफान राडा

SCROLL FOR NEXT