

खचाखच भरलेल्या लोकल्स, ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते.....कोलमडलेली आरोग्य व्यवस्था....मुंबईकरांच्या जीवावर उठलेल्या प्रदूषणाच्या मुद्द्याऐवजी मुंबई महापालिकेची निवडणूक पुन्हा धर्म, भाषा, प्रांत, आणि मराठी अस्मितेच्या भोवतीच फिरत असल्याचं दिसतंय. .....मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी संघर्ष पेटलाय.. त्यामुळे उमेदवारी देतांनाही सर्वच राजकीय पक्षांनी धर्म, भाषा, प्रांताला महत्व दिलंय...यात सर्वच पक्षांनी मराठी उमेदवारांना प्राधान्य दिल्याचं दिसतंय. मुंबईत मराठी आणि परप्रांतीयांची संख्या जवळपास सारखीच आहे. त्यामुळे मराठीनंतर सर्वच पक्षांनी मुस्लीम उमेदवारांना प्राधान्य दिलंय. कोणत्या पक्षानं कुणाला किती उमेदवारी दिलीय ते पाहूयात...
ठाकरेसेनेनं 163 पैकी 143 मराठी, 10 मुस्लीम, 4 दक्षिण भारतीय, 3 गुजराती आणि 3 ख्रिश्नन उमेदवारांना संधी दिलीय.. तर ठाकरेंची युती असलेल्या मनसेनं 52 पैकी 47 मराठी तर त्याखालोखाल 2 मुस्लीम आणि 2 गुजराती आणि 1 उत्तर भारतीयाला उमेदवारी दिलीय... काँग्रेसनं 152 पैकी 61 मराठी, 36 मुस्लीम, 26 उत्तर भारतीय, 10 गुजराती, 7 दक्षिण भारतीय, 6 ख्रिश्चन, 3 राजस्थानी आणि 3 पंजाबी आणि सिंधी समाजाला उमेदवारी दिलीय. तर भाजपनं 137 पैकी 93 मराठी, 16 गुजराती, 14 उत्तर भारतीय, 6 राजस्थानी, 4 दक्षिण भारतीय आणि 2 सिंधी
त्याबरोबरच 2 ख्रिश्चन उमेदवारांना उमेदवारी दिलीय.. मात्र भाजपनं मुस्लीमांना उमेदवारी दिली नसली तरी महायुतीचा मित्रपक्ष शिंदेसेनेनं 91 पैकी 72 मराठी तर दुसऱ्या क्रमांकावर 12 मुस्लीमांना संधी दिलीय..त्याखालोखाल 3 उत्तर भारतीय, 3 गुजराती तर 1 दक्षिण भारतीय उमेदवाराला प्राधान्य दिलंय.. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 94 पैकी 53 मराठी, तर दुसऱ्या क्रमांकासह 22 मुस्लीमांना आणि 11 उत्तर भारतीय, 4 दक्षिण भारतीय, 3 ख्रिश्चन आणि 1 गुजराती भाषिकाला संधी दिलीय
खरंतर मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केलाय.. तर ठाकरेंना उत्तर देण्यासाठी भाजपनं हिंदू, हिंदीची साद घातलीय.त्यात आता 36 लाख मराठी मतदार असले तरी 17 लाख उत्तर भारतीय आणि 15 लाख गुजराती, मारवाडी आहेत.. त्यांची बेरीज 32 लाखांवर जाते. तर तर मुस्लिमांची संख्या २० लाखांच्या आसपास आहे.
त्यामुळे मुंबई महापालिकेच्या यशाचं समीकरण जुळवण्यात मुस्लीम समाज महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. मात्र जाती-धर्म आणि मराठी-अमराठी मतांच्या ध्रुवीकरणाच्या खेळीमुळे मुंबईकरांच्या मूळ समस्या याही निवडणुकीत हरवणार तर नाहीत ना? हा खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.