Hindu
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election: भाजपसोबत संघ मतभेद विसरणार; विधानसभेसाठी मैदानात उतरणार

Assembly Election: भाजपसोबतचे मतभेद विसरून राष्ट्रीय स्वसंसेवक संघाने आगामी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. आगामी विधानसभेत संघ मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यासाठी खास समन्वयकाची नियुक्ती करण्यात आलीय. नेमकी काय रणनीती आहे भाजप आणि संघाची त्यावरचा हा रिपोर्ट.

Tanmay Tillu

लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलंय.. लोकसभेवेळी प्रचारापासून काहीसा लांब राहिलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता विधानसभेसाठी सक्रिय झालाय. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि संघात समन्वय पाहायला मिळाला नव्हता.याचा फटका भाजपला राज्यात बसला होता. तसा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी संघ आणि भाजपमध्ये महाराष्ट्रात समन्वयाची जबाबदारी अतुल लिमये यांच्याकडे सोपवण्यात आलीये .

येत्या महिन्यातभरात संघ आणि भाजप नेत्यांच्या बैठका होणार आहेत. दरम्यान कोण आहेत अतुल लिमये आणि त्यांच्यावर संघानं का जबाबदारी सोपवलीये पाहया.

कोण आहेत अतुल लिमये ?

वयाच्या 50 व्या वर्षी अतुल लिमये सह सरकार्यवाह

पहिल्यांदाच इतक्या कमी वयाच्या व्यक्तीची नेमणूक

संघातील तिसऱ्या महत्त्वाच्या पदी लिमये

पश्चिम प्रांताचे 'क्षेत्र प्रचारक' म्हणूनही कार्य

राज्यात संघाच्या विस्तारात योगदान

गुजरात, नागपूरसह गोव्यातही संघासाठी काम

भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानं आता विधानसभेची सूत्र हाती घेतलीयेत. भाजपला संघाची गरज उरली नाही अशी वल्गना लोकसभेआधी जे.पी.नड्डांनी केली होती. त्यानंतर राज्यातील महायुतीत अजित पवारांच्या समावेशानं संघानं भाजपला चांगलचं फटकारलं. अखेर मातृसंस्था असलेल्या संघानं भाजपची चूक पदरात घेत विधानसभेसाठी कंबर कसलीये. आता भाजपला याचा फायदा होणार का आणि जिथे भाजपचा उमेदवार नाही तिथे महायुतीसाठी संघ कार्यकर्ता राबणार का ? हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT