Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीत वादाची ठिणगी; आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी मनातील सगळंच सांगितलं, कोणत्या जागांवर केला दावा?

Maharashtra Political news : महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. महायुतीच्या जागावाटपात आरपीआय पक्षाने काही जागांची मागणी केली होती. मात्र, आरपीआयला किती जागा मिळाल्या, याबाबत स्पष्टता नाही.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. महायुतीच्या जागावाटपात आरपीआय आठवले गटाने ५ ते ६ जागांची मागणी केली होती. मात्र, मागणी फेटाळल्याचा आरोप आरपीआयने केला आहे. यावेळी महायुतीतील भाजपवरही आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महायुतीत भाजपने काही दिवसांपूर्वी ९९ जागांवर उमेदवार जाहीर केले. तर शिंदे गटाने मंगळवारी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या जागावाटपात आरपीआय आठवले गटाला किती जागा मिळाल्या, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या जागावाटपात स्थान मिळत नसल्याने आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने आरपीआयला जागा सोडवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. आरपीआयने पत्रकार परिषद घेऊन आम्हाला जागा जाहीर होत नाहीत, तोपर्यंत तटस्थ राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.

आरपीआय आठवले गटाची मुंबईतील चेंबूर, धारावी, अहमदनगरमधील श्रीरामपूर, उत्तर नागपूर, यवतमाळमधील उमरखेड, नांदेडमधील देगलूर, पुण्यातील पिंपरी चिंचवड, कॅन्टोन्मेंटसह इतर जागांची मागणी होती. येत्या दोन ते तीन दिवसांत जागा जाहीर कराव्यात. आम्हाला जागा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही महायुतीचे काम न करणार नसल्याचे आरपीआयने स्पष्ट केले. पुण्यातील कॅन्टोन्मेंट मतदारसंघ द्यावा,आरपीआयची आग्रही मागणी आहे. लोकसभेसारखी परिस्थिती विधानसभेमध्ये होत आहेत. भाजप दिलेला शब्द पाळत नाही, त्यामुळे महायुतीमधील तीन मित्रपक्षाने आमचा विचार करावा, अशी मागणी आठवले गटाने केली आहे.

बीडमध्येही आरपीआय आक्रमक

बीड विधानसभा मतदारसंघातही वादाची ठिणगी पडली आहे. बीडच्या राखीव केज मतदारसंघात भाजपने नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या जागेवरील उमेदवारी मागे घेऊन, रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांना उमेदवारी द्या, अशी मागणी करत आरपीआयने आक्रमक भूमिका घेतली आहे. नमिता मुंदडा यांच्या उमेदवारीनंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन कमळ आणि महायुतीला मतदान करायचं नाही, असा ठराव केलाय.

'भाजप आणि महायुतीला आमचं मतदान हवंय. मात्र, उमेदवार नकोत. ही खेळी चालणार नाही. भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भावना आरपीआय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पप्पू कागदेंना उमेदवारी दिली नाही तर कमळ फुलू देणार नाही, अशा इशारा रिपाईं कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेकापचे जयंत पाटील घेणार शरद पवारांची भेट

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरला मिळणार राज्याचा दर्जा? केंद्र सरकार मोठ्या तयारीत; वाचा सविस्तर माहिती

IND vs NZ, 2nd Test, Day 1: पहिल्या दिवसांचा खेळ संपला, १६ धावांवर टीम इंडियाने गमावली १ विकेट

Maharashtra Election : मोठी बातमी! राज्यात मतदानाच्या दिवशी सुट्टी, नेमकी कुणाला मिळणार?

VIDEO : वडगाव शेरी मतदारसंघात ट्विस्ट; महायुतीत ठिणगी पडणार ?

SCROLL FOR NEXT