Rohit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Rohit Pawar : ईडीच्या आरोपपत्रानंतर रोहित पवार आक्रमक, थेट कोर्टात जाणार; सत्ताधारी शिवसेना-भाजपचे ९७ लोक असल्याचा दावा

Rohit Pawar News : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे नाव होते. या एकूण ईडी प्रकरणावर रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ईडीद्वारे न्यायालयामध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपपत्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे नाव नमूद करण्यात आले. या एकूण प्रकरणावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली बाजू मांडली.

ईडीने माझ्या नावाचे आरोपपत्र दाखल केले आहे. एमएसी बँकेकडून २०१२ मध्ये कर्द घेतलेले आहे. त्यासाठी हे आरोपपत्र दखल केले होते. एका कारखान्यासाठी कर्ज घेतले होते. २००९ मध्ये कन्नड सहकारी साखर कारखान्यासाठी टेंडर काढण्यात आले. एमएसी बँकेने आर्थिक तफावत असल्याचा रिपोर्ट नाबार्डला २०११ मध्ये देण्यात आला होता, असे रोहित पवार म्हणाले.

तिसऱ्यांदा कन्नड कारखान्याचे टेंडर निघाल्यानंतर आम्ही बारामती ॲग्रोने हा कारखाना घेतला. नाबार्डने १०० लोकांची नावे घेतली होती. ईडीच्या आरोपपत्रात ९७ लोकांची नावे आहेत, मात्र त्यावेळी यात माझे नाव नव्हते. ९७ लोकांचे नाव बाजूला ठेवून माझ्या एकट्यावर कारवाई केली जात आहे. माझा आवाज दाबण्याचा सरकार आणि त्यांचे एजन्सीच्या माध्यमातून झाला आहे. यात मुद्दामून माझे नाव घेतले गेले आहे, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.

रोहित पवार म्हणाले, तो कारखाना माझा आहे मी चालवतो त्यात कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. माझी बारा-बारा तास चौकशी करण्यात आली. आरोप पत्र दाखल झाले ईडीला यात काही सापडले नाही. या प्रकरणी कोर्टात जाऊन मागोवा घेणार आहोत. कुठेही आणि चुका केल्या नाहीत कुठेही चुकीचं काही केलं नाही त्यामुळे मला विश्वास आहे, न्यायालयाच्या माध्यमातून मला न्याय मिळेल. फॅशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल आणि ही लढाई मी जिंकणार आहे मी कुठेही काही चुकीचं केले नाही.

आम्ही घाबरणारी पळणारी लोक नाही, आम्ही लढणारी लोक आहोत. मराठी माणसं आहोत, दिल्लीसमोर आणि कधीही झुकत नाही. ही विचारातची लढाई आहे, विचारांबरोबर अजून आहे आणि पुढेही राहणार आहे. अनेक लोक पळून गेले लाचारी स्वीकारली आम्ही तसे करणार नाही. ९७ लोकांमधील काही लोक भाजपमध्ये काही अजित दादाकडे काही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. मी एकटा ईडी विरोधात लढत आहे लढणार आणि जिंकणार, असे पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गातून आरक्षण मागणीसाठी भव्य महामोर्चा

Singer Passes Away: आधी बाईकवरुन अपघात, नंतर हार्ट अटॅक; प्रसिद्ध गायकाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

चंद्रकांत पाटलांचा निकटवर्तीय समीर पाटीलचा निलेश घायवळसोबत फोटो; रवींद्र धंगेकरांनी थेट पुरावाच दाखवला|VIDEO

ST Bus: दीपोत्सवाची एसटीकडून तयारी, पुण्यातून ५९८ अतिरिक्त बस, कुठून सुटणार एसटी?

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅप वापरुन बना श्रीमंत! दरमहा लाखो रुपये कमवण्याचे ५ स्मार्ट मार्ग, एकदा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT