Loudspeakers: महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार, ३३६७ धार्मिक स्थळांचे भोंगे काढले; CM देवेंद्र फडणवीसांची माहिती

CM Devendra Fadnavis On Loudspeakers: राज्यातील धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्यातील ३३६७ धार्मिक स्थळांचे भोंगे काढण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
Loudspeakers: महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार, ३३६७ धार्मिक स्थळांचे भोंगे काढले; देवेंद्र फडणवीसांची माहिती
LoudspeakersSaam Tv
Published On

महाराष्ट्र सरकारने ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी पाऊलं उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत याबाबत मोठी माहिती दिली. राज्यातील धार्मिक स्थळांवरून एकूण ३,३६७ भोंगे काढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यामधील १,६०८ भोंगे हे एकट्या मुंबई शहरातील आहेत. ही संपूर्ण कारवाई अगदी शांतीपूर्व करण्यात आली. यामुळे कोणताही सांप्रदायिक किंवा धार्मिक वाद निर्माण झाला नाही.

महाराष्ट्रामध्ये भोंग्यांचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते अशा अनेक तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार धार्मिक स्थळांवर भोंग्यांचा वापर रात्री १० वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत करू नये असे सांगण्यात आले आहे. तर दिवसामध्ये अधिकतम ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल ही ध्वनी मर्यादा निश्चित केली आहे.

Loudspeakers: महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार, ३३६७ धार्मिक स्थळांचे भोंगे काढले; देवेंद्र फडणवीसांची माहिती
Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

मुख्यमंत्र्यानी विधानसभेत सांगितले की, पोलिसांना नियमाचे कठोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जर कोणतेही धार्मिक स्थळ परवानगीशिवाय भोंगे पुन्हा लावत असेल तर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार असतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यांबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंग्यांवरील कारवाईबाबतची ही माहिती दिली.

Loudspeakers: महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार, ३३६७ धार्मिक स्थळांचे भोंगे काढले; देवेंद्र फडणवीसांची माहिती
Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

मुंबईतमध्ये १,६०८ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले आहेत. यामध्ये १,१४९ मशिदींचा समावेश आहे. तर ४८ मंदिरे, १० चर्च, ४ गुरुद्वारा यांचा देखील समावेश आहे. या निर्णयामुळे मुंबई आता पूर्णपणे भोंगेमुक्त झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयानंतर आता राज्यातील एखाद्या धार्मिक स्थळांवर जर भोंगा लागला तर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातील भोंगे काढण्याबाबतच्या सरकारच्या या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटाचे विधिमंडळातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

Loudspeakers: महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार, ३३६७ धार्मिक स्थळांचे भोंगे काढले; देवेंद्र फडणवीसांची माहिती
Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com