Rohit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Rohit Pawar: थोरले मुंडे साहेब असते तर चाबकाने मारलं असतं अन्..., रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar On Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे आज राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे राजीनामा मागितला आहे. यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा मागितला आहे.आता यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील काल फोटो समोर आले आहेत. संतोष देशमुखांना खूप अमानुषपणे मारण्यात आले. त्यानंतर काल रात्रीपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल रात्रीच धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यावर रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वाल्मीक कराड धनंजय मुंडेंचा खास आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात तुम्ही हे फोटो घेऊन ज्या पद्धतीने वागत आहात त्यावरुन अप्रत्यक्षपणे तुम्ही वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडेंची पाठराखण करत आहात, असं आमचं मत आहे.अजितदादांना मला सांगायचं आहे एक नागरिक म्हणून आणि पुतण्या म्हणून मला त्यांना सांगायचा आहे की आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला हवा. पंकजा ताईंनादेखील विनंती करणार आहे की, तुमचे भाऊ असो किंवा तुम्हाला निवडणुकीत मदत केली असो परंतु थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने मारला असता आणि राजीनामा द्यायला लावला असता, असं रोहित पवारांनी सांगितलं.

जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही. ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. सर्व महाराष्ट्राची भूमिका आहे.ही राक्षसी प्रवृत्ती जी महाराष्ट्रात वाढत आहे ती जर थांबवायची असेल तर सरकारच्या माध्यमातून आज निर्णय घेतला पाहिजे.तो निर्णय घेतला गेला नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सरकारला माफ करणार नाही. काहीजण या घटनेला राजकीय वळण देत आहे. मात्र, जी झळ देशमुख कुटुंबाला बसली तो व्यक्ती कोणत्याही समाजाचा असला असता तरी महाराष्ट्र त्याच्यामागे उभा राहिला असता. यामध्ये कराडला ७-८ वर्षांची शिक्षा होऊ शकते. यामध्येही अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे याप्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी, अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, असं रोहित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमधील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

आता जमिनीची वाटणी होणार मोफत, फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Earthquake : मणिपूरला भूकंपाचे हादरे! ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Periods Mental Health : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

SCROLL FOR NEXT