Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संताप; बीड जिल्हा बंदची हाक

Santosh Deshmukh Case Beed District Bandh : बीड जिल्हा बंदच्या पोस्ट सध्याला सोशल माध्यमांवरती व्हायरल होत आहेत. संतोष देशमुख हत्या, खंडणी व अट्रोसिटी या तीन गुन्ह्यांचा तपास करून सीआयडीच्या विशेष तपास पथकाने दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case Beed District BandhSaam tv
Published On

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने पूर्ण होत आहेत. या हत्या प्रकरणांमध्ये माणुसकीला काळीमा फासलाय, अशी संतोष देशमुख यांच्या हत्यावेळीचे काही फोटो समोर आलेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून आरोपींनी त्यांचा छळ करताना आणि मारहाण करत असल्याचे फोटो समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. संतोष देशमुख हत्या, खंडणी व अट्रोसिटी या तीन गुन्ह्यांचा तपास करून सीआयडीच्या विशेष तपास पथकाने दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

Santosh Deshmukh Case
Santosh deshmukh Case : हत्येचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल; सरपंच हत्येतील मोकारपंथी कोण? पाहा स्पेशल रिपोर्ट

यासोबत पुरावे म्हणून देशमुख यांना आरोपींनी मारहाण करतानाचे, विवस्त्र करतानाचे आणि अन्य घृणास्पद कृत्य करतानाचा व्हिडिओ केला. तपास यंत्रणांनी या व्हिडिओचे स्क्रीन शॉट काढून त्याची फॉरेन्सिक तपासणी केली व हे फोटो चार्जशीट सोबत पुरावे म्हणून जोडले. सदर फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभाग यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. तपासाचा भाग असलेले काही फोटो प्रसारित झाले आहेत. सदरील फोटो हे मन विचलित करणारे आहेत. त्यामुळे व्हायरल फोटोंवरून समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. "सदर प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट असून सदर फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे जनतेने कायदा हातात घेऊ नये" असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com