Nashik crime news update
Nashik crime news update Saam Tv
महाराष्ट्र

गोळीबार करून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केला, नागरिकांनी धाव घेतली, त्यानंतर...

अभिजीत सोनावणे

नाशिक : मालेगावमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गावठी कट्ट्यातून गोळीबार करुन तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून एका तडीपार गुंडाने (Robbery at nashik) व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिकांच्या सतर्कतेमुळं गुंडाचा डाव हाणून पाडला. या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही. दरेगाव शिवारातील फेमस मार्केट परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली (culprit arrested) असून पोलिसांचे पथक त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गिट्ठी कारखान्याचे व्यापारी दिनेश रुंग्ठा त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्याचवेळी सराईत गुन्हेगारांनी त्यांच्या कार्यालयात घुसून रोख रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला. सदर गुंडांनी शस्त्राच्या धाकाने व्यापारी दिनेशला लुटण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आजुबाजूला असलेल्या नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतल्याने गुंडांचा चोरीचा प्रयत्न फसला.याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलिसांचे पथक त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Irrfan Khan Death Anniversary : इरफान खानचे 'हे' १० चित्रपट आवश्य पाहा, आजही होतेय अभिनयाचे कौतुक

Most Expensive Mango: जगातील सर्वात महाग आंबा कोणता?

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ कसा टिकणार? वाचा टिप्स

Net Saree Tips: नेटची साडी धुताना घ्या 'या' गोष्टीची काळजी

PM मोदींना दिलासा; हायकोर्टाने निवडणूक बंदीची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT