Narayan Rane : नारायण राणे यांचा खोडसाळपणा जाणार नाही, मनिषा कायंदे भडकल्या

शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी नारायण राणे यांच्यावर तोफ डागली आहे.
Narayan rane and manisha kayande
Narayan rane and manisha kayandesaam tv
Published On

मुंबई : एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या मदतीने राज्यात सत्तांतर केलं. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनीही ठाकरे कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडलं. याच पार्श्वभूमीवर राणे आणि ठाकरे संघर्ष पुन्हा पेटल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी नारायण राणे यांच्यावर तोफ डागली आहे. भाजपने नारायण राणे यांना मंत्रिपद देऊन मातोश्रीला दुखावले आहे. राणे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर नेहमी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करत आहेत. त्यांचा हा खोडसाळपणा जाणार नाही, अशी खरमरीत टीका कायंदे यांनी नारायण राणे यांच्यासह भाजपवर केली आहे.

Narayan rane and manisha kayande
Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायती आमच्याच; विजयानंतर शिंदे-ठाकरे गटाचा दावा

माध्यमांशी बोलताना कायंदे पुढे म्हणाल्या, नारायण राणे आणि त्यांच्या दोन सुपुत्रांबाबत शिवसेनेची भूमिका बदलणार नाही. तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय झाले तर आनंदच होईल. आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढत असताना तेजस ठाकरे सतत त्यांच्यासोबत असायचे. अनेक राजकीय सभांना त्यांची उपस्थिती असायची. ठाकरे कुटुंबावर जनतेचे प्रेम आहे. त्यामुळे ठाकरे घराण्यातील अजून एक व्यक्ती राजकारणात आला तर जनता त्याला प्रतिसाद देईल.

Narayan rane and manisha kayande
Patra Chawl Case: पत्राचाळ प्रकरणात वर्षा राऊतांची भूमिका काय ? ईडीच्या वकिलांनी केले धक्कादायक आरोप

भाजपने नारायण राणे यांना मंत्रिपद देऊन मातोश्रीला दुखावले आहे. राणे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर नेहमी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करतात. राणे यांचा खोडसाळपणा जाणार नाही. तसंच एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आमदार दीपक केसरकर यांच्यावरही कायंदे यांनी निशाणा साधला. दीपक केसरकर हे नव्याने प्रवक्ते झाले आहेत. कॅमेरा दिसला की काहीही बोलत सुटतात. एकीकडे आरोप करतात, तर दुसरीकडे शिवसेनेतच आहोत, असं केसरकर म्हणतात. केसरकर बिथरले आहेत. त्यांच्याकडे कोणताही गौप्यस्फोट नाही, असंही कायंदे म्हणाल्या.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com