road washed out in kalamb near nandurbar  Saam Digital
महाराष्ट्र

Nandurbar: शहादा तालुक्यात कोसळला मुसळधार पाऊस, नाल्याचे पाणी शिरलं गावात; मुख्य रस्ताच वाहून गेला

road washed out in kalamb near nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात काही भागात दमदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला. या पाण्यामुळे बहुतांश गावात घाणीचे साम्राज्य झाले आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर माेठे माेठे खड्डे पडले आहेत. जिल्ह्यातील सारंगखेडा गावाजवळ असलेल्या कळंबू गावात नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे गावातील मुख्य रस्ता वाहून गेला आहे. परिणामी ग्रामस्थांची माेठी गैरसाेय निर्माण झाली आहे.

कळंबू गावात जोरदार पाऊस झाल्याने गावात गाळ आणि कचरा वाहून आला. त्यामुळे गावात अतिशय दुर्गंधी पसरली आहे. गावात रहदारीसाठी एकच रस्ता असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

कळंबू गावात रस्ता दुरुस्ती आणि सफाईचे काम त्वरित करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. साम टीव्हीशी बाेलताना ग्रामस्थ किशोर पाटील म्हणाले गावात साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे आराेग्याचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चार दिवस काम ३ दिवस सुट्टी; भारतात लागू होणार नवा नियम? कसं असेल तुमच्या ड्युटीचं शेड्यूल

परीक्षा देऊन विद्यार्थिनी रिक्षाने घरी निघाली; रस्त्यात चालकाची नियत फिरली; निर्जनस्थळी अब्रू लुटली

Amaravati Accident : भयंकर! दरीत कोसळणाऱ्या बसला अडवताना विपरीत घडलं, चालकाचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी; पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Monday Horoscope : कामाची दगदग वाढेल; ५ राशींच्या लोकांच्या डोक्याचं टेन्शन वाढणार

SCROLL FOR NEXT