Maharashtra Band Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Band : महाराष्ट्र बंदला उस्फुर्त प्रतिसाद; बीड मार्केटमध्ये शुकशुकाट, नांदेडमध्ये कडकडीत बंद

Beed Nanded News : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Rajesh Sonwane

विनोद जिरे/ संजय सूर्यवंशी 

बीड/ नांदेड : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला प्रतिसाद मिळत असून (Beed) बीडमध्ये दुकाने बंद असल्याने मार्केटमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. तर नांदेडमध्ये (Nanded) देखील कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. (Tajya Batmya)

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा, यासाठी सकल मराठा समाजाच्या (Maratha Aarkshan) वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला बीड जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून बीड शहरामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली बाजारपेठेमधील दुकाने बंद ठेवली आहेत. दरम्यान बीड शहरातील मुख्य मार्केट सुभाष रोडवर दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेडमध्ये कडकडीत बंद

नांदेड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. नांदेड शहर आणि अनेक तालुक्यात सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. या बंदच्या पार्श्भूमीवर कुठलही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT