Maharashtra Politics : काँग्रेसमध्ये गळती हंगाम सुरुच? नांदेडमधील तीन आमदार भाजपच्या गळाला?

Nanded Latest News : आज मंगळवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Congress Political News
Congress Political NewsSaam tv
Published On

सूरज मुसरकर, मुंबई

Maharashtra Political News:

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज मंगळवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नांदेडमधील भाजपचे आणखी तीन आमदार पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाणांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर काँग्रेसचे आणखी तीन आमदार भाजपच्या गळाल्या लागल्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात तीन आमदार पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Congress Political News
Nana Patole : अशोक चव्हाणांना शेवटच्या रांगेत बसावं लागेल...; भाजप प्रवेशावर नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

नांदेडमधील देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतारपूरकर, नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे, हदगावचे आमदार माधवराव पाटील हे आमदार पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याची आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे

अशोक चव्हाण काय म्हणाले होते?

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर इतर समर्थक आमदार त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या चर्चेवर अशोक चव्हाणांनी एका वाक्यात उत्तर दिलं. 'मी कोणालाही बोलावलेलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. 'काँग्रेसचा चॅप्टर ओव्हर झालाय. मी नवीन सुरुवात करतोय, असंही ते म्हणाले

Congress Political News
CM Eknath Shinde: नाहीतर तुमचीही सफाई करेन..., ५१५० इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण सोहळ्यात CM शिदें अधिकाऱ्यांवर का भडकले?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं होतं. अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत १५ फेब्रुवारीला पक्ष प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात होती. मात्र, आजच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाणांच्या भाजप प्रवेशाआधीच 'आगे आगे देखो होता है क्या? असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात आणखी काय राजकीय भूकंप होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com