Police and locals gather at the site after a nitrogen gas cylinder used for inflating balloons exploded near a college stop in Malegaon. Saam Tv
महाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनी दुर्घटना! फुगे फुगवताना सिलेंडर फुटला, पाच जण जखमी

Nitrogen Gas Cylinder Explosion In Malegaon: नाशिकच्या मालेगाव शहरात कॉलेज स्टॉपजवळ नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले.

Omkar Sonawane

नाशिकच्या मालेगाव शहरात आज सकाळच्या सुमारास कॉलेज स्टॉप जवळ नायट्रोजन गॅसने फुगे फुगवणा-या एका सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली असून या ठिकाणी फुगे विकत घेण्यासाठी गेलेले पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. स्फोट झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरीकांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले,यात दोन लहान मुले, महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून, यातील दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले आहे.

दरम्यान गॅस सिलेंडर फुटल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. तर हॉस्पिटल परिसरात नागरीकांनी गर्दी केली होती. प्रजासत्ताक दिना निमित्त तिरंगा फुगे फुगवणे सुरू होते. ही फुगे घेण्यासाठी दोन मुले आपल्या परिवारासोबत गेले असता अचानक फुगे फुगवण्याऱ्या नायट्रोजन गॅस मशीनचा स्फोट झाला. यामध्ये हे सर्वजण जखमी झाले. यावेळी उपस्थितांनी तात्काळ सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

विनोद थोरात, मोहित जाधव, अतुल शेवाळे,प्रमिला यादव आणि उज्वला महाजन असे जखमींचे नाव आहेत. यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकमध्ये पुढील उपचारासाठी हलवले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून स्फोटाचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे. दरम्यान रुग्णालय परिसरात नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गिरीश महाजनांना प्रजाकसत्ताक दिनाचं भाषण भोवणार; प्रकाश आंबेडकरांची आक्रमक भूमिका

तिरंगा हातात घेऊन युवकाची स्टंटबाजी, व्हिडीओ व्हायरल

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी कोणतं मीठ आहारात वापरावं? जाणून घ्या मीठाचा शरीरावर होणारा परिणाम

Maharashtra Live News Update: धुळ्यात आंबेडकरी अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोला जोडे मारून त्यांच्या फोटोचे दहन केले

Diabetes : शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणत्या भाज्या रोजच्या आहारात असाव्यात? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT