SSC HSC Exam Saam tv
महाराष्ट्र

SSC-HSC Exam Form 17: फॉर्म १७ द्वारे दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्यांना दिलासा, अर्ज करण्याची मुदत वाढवली

SSC HSC Exam: फॉर्म १७ द्वारे दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे.

Priya More

Summary -

  • दहावी-बारावीच्या फॉर्म १७ अर्जाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली.

  • फॉर्म १७ द्वारे खासगी विद्यार्थ्यांना थेट परीक्षा देता येणार आहे.

  • अर्ज ऑनलाईन भरून प्रिंटआऊट काढणे आवश्यक.

  • अर्जासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, फोटो व शुल्क आवश्यक.

फॉर्म १७ द्वारे दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे खासगिरित्या फॉर्म १७ भरून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या नाव नोंदणीला मुदत वाढ मिळाली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज भरला नाही त्यांनी लवकरात लवकर म्हणजे १५ सप्टेंबरपूर्वी अर्ज भरावा.

मिळालेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या १७ नंबर परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरता येणार आहे. आधी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. आता १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. १११० रुपये परीक्षा शुल्क भरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.

महत्वाचे म्हणजे ही परीक्षा त्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते जे नियमित शाळेत जाऊ शकत नाही किंवा शिक्षण घेऊ शकत नाहीत. ज्यांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे असे विद्यार्थी ही परीक्षा देऊन आपले शैक्षणिक वर्ष पूर्ण करतात. फॉर्म १७ भरण्यासाठी विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http://www.mahahsscboard.in वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.

फॉर्म १७ भरून विद्यार्थ्यांना डायरेक्ट दहावी आणि बारावीची परीक्षा देता येणार आहे. यासाठी त्यांना शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत, ती नसेल तर द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. हा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना १११० रुपये नोंदणी शुल्क, प्रक्रिया शुल्क १०० आणि विलंब शुल्क १०० रुपये भरावे लागणार आहेत. फार्म १७ भरल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ नाराज नाहीत, त्यांच्या मनातील शंका दूर करू - मुख्यमंत्री फडणवीस

Public Holiday 2025 : ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे की नाही? महत्वाची माहिती आली समोर

आधी मंदिरात लग्न नंतर जंगलात बलात्कार; ६० वर्षीय वृद्धाचं १५ वर्षीय मुलीसोबत हैवानी कृत्य

GST गिफ्टसाठी दिवाळीऐवजी नवरात्रीचा मुहूर्त साधला, मोदी सरकारचा नेमका मास्टरप्लॅन काय?

Raigad Crime : माणगावमध्ये सशस्त्र दरोडा; २० ग्राम सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या

SCROLL FOR NEXT