Reliance Jio Saam Digital
महाराष्ट्र

Jio Recharge Plan: 51 रुपयांमध्ये True Unlimited डेटा, Reliance Jio ने ग्राहकांसाठी आणले 3 स्वस्त रिचार्ज प्लॅन

Rs 51, 101,151 Reliance Jio Recharge Plans Detail: Jio च्या अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद फक्त 51 रुपयांमध्ये घेता येणार आहे. कंपनीने ३ स्वस्त True Unlimited अपग्रेड प्रीपेड प्लॅन जारी केले आहेत, ज्यात 51 रुपयांच्या प्लॅनचा देखील समावेश आहे.

Sandeep Gawade

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) अलीकडेच आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. याशिवाय कंपनीने मोफत अमर्यादित 5G इंटरनेटची सेवाही बंद केली आहे. पण तुम्हाला माहित आहे का Jio च्या अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद फक्त 51 रुपयांमध्ये घेता येतो. कंपनीने ३ स्वस्त True Unlimited अपग्रेड प्रीपेड प्लॅन जारी केले आहेत, ज्यात 51 रुपयांच्या प्लॅनचा देखील समावेश आहे.

तीन रिचार्ज प्लॅन ॲड-ऑन पॅक आहेत. तुमच्याकडे आधीपासूनच रिचार्ज असणे आवश्यक आहे, त्यानंतरच तुम्हाला या तीन प्लॅनचे फायदे मिळतील. तुम्हाला हे वेगळे विकत घ्यावे लागतील, तुम्ही या तीन रिचार्ज प्लॅनवर अवलंबून राहून अमर्यादित 5G इंटरनेटचा लाभ घेऊ शकत नाही.

नवीन प्लॅन्स अंतर्गत, ज्यांच्याकडे 5G सपोर्टेड स्मार्टफोन आहे, त्यांनाच अमर्यादित 5G डेटाचा लाभ मिळेल. Jio True 5G नेटवर्कशी कनेक्ट केल्यावरच अमर्यादित 5G डेटा काम करेल. या तीन प्लॅनमध्ये मर्यादित 4G डेटा दिला जात आहे.

१५१ रुपयांचा प्लॅन

4G डेटा: 9GB हाय स्पीड डेटा

5G डेटा: अमर्यादित हाय स्पीड डेटा (Jio True 5G नेटवर्कवरील 5G ​​सपोर्टेड डिवाइससाठी)

१०१ रुपयांचा प्लॅन

4G डेटा: 6GB हाय स्पीड डेटा

5G डेटा: अमर्यादित हाय स्पीड डेटा (Jio True 5G नेटवर्कवरील 5G सपोर्टेड डिवाइससाठी)

५१ रुपयांचा प्लॅन

4G डेटा: 3GB हाय स्पीड डेटा

5G डेटा: अमर्यादित हाय स्पीड डेटा (Jio True 5G नेटवर्कवरील 5G ​​सपोर्टेड डिवाइससाठी)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT