Ravikant Tupkar Saam TV
महाराष्ट्र

Ravikant Tupkar: 'हिंमत असेल तर, माझ्याशी दोन हात करावे...'; शिंदे गटातील आमदारांना रविकांत तुपकरांचं खुलं आव्हान

Buldhana News Today: माझ्याशी दोन हात करावेत. त्यासाठी माझी तयारी आहे, अशा शब्दांत रविकांत तुपकरांनी खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमूलकर यांना ओपन चॅलेंज केलं आहे.

Ruchika Jadhav

Buldhana:

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. शिंदे गटाचे आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता तुपकरांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर देत खुलं आव्हान केलं आहे.

तुम्ही भाडोत्री गुंडांना पाठवता. मात्र हिंमत असेल तर खासदार आणि आमदारांनी माझ्याशी दोन हात करावेत. त्यासाठी माझी तयारी आहे, अशा शब्दांत रविकांत तुपकरांनी खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमूलकर यांना ओपन चॅलेंज केलं आहे.

मला तुरुंगात टाकण्याचं प्लानिंग सुरू आहे

मला तुरुंगात टाकण्याचं सरकारचं प्लानिंग सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासून आम्हला बाजूला ठेवायचं म्हणून १ वर्ष तुरुंगात ठेवण्याची मागणी सरकारने कोर्टात केली आहे. मला तडीपार करायचं प्लानिंग देखील सुरू आहे. माझ्यावर विविध ऍक्ट लावायची तयारी सुरु आहे, अशा शब्दांत तुपकरांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

बुलढाण्यात शेतकरी संघर्ष यात्रेच्या समारोपावेळी एल्गार सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना रविकांत तुपकरांनी असं म्हटलं आहे. पुढे त्यांनी प्रतापराव जाधव यांचाही उल्लेख करत टीका केली. मला तुरुंगात टाका, फासावर चढवा, जेलमध्ये टाका मात्र मी तुरुंगातून लोकसभा लवढवणार पण थांबणार नाही, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

SCROLL FOR NEXT