मोदी यांची विचारधारा राजेशाही आहे. काँग्रेस पक्षात लहान कार्यकर्ता कोणत्याही नेत्याला टोकू शकतो. मी त्यांचं ऐकतो. त्याचा आदर करतो. मी सहमत नसलो तरी ऐकतो. परंतु भाजपमध्ये मात्र गुलामी चालू आहे. राजाप्रमाणे पंतप्रधान मोदी हुकूम सोडतात. नाना पटोले यांनी शेतकऱ्यांना विषय प्रश् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला होता. GST लावला त्यात शेतकऱ्यांना हिस्सा असणार का हा प्रश्न मोदींना आवडला नसल्याने पटोले पक्षातून आउट झाले, असल्याची टीका राहुल गांधींनी केली. (Latest News)
नागपुरात काँग्रेसचा १३९ व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम (Congress Foundation Day Nagpur) पार पडला. त्यामध्ये बोलताना राहुल गांधींनी भाजपवर टीका केली. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर बेरोजगारी, ओबीसी, हुकूशाही, आरएसएसवरून टिकास्त्र सोडलं.
भाजपात फक्त आदेश पाळावा लागतो
भाजपमध्ये (BJP) राजेशाही चालते. तेथे गुलामी चालतेय, असा टोला राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भाजपला लगावला. मला एक भाजपचा खासदार भेटला त्यांनी सांगितले, ते भाजपमध्ये असूनही त्यांना ते सहन होत नाही. माझं मन काँग्रेसमध्ये (congress) आहे. मग मी त्यांना सांगितले की, शरीर भाजपमध्ये आहे, मन काँग्रेसमध्ये आहे, तर आमच्या पक्षात का येत नाहीत. त्यावर उत्तर देताना खासदार (MP) म्हणाले भाजपमध्ये गुलामी आहे. वरून आदेश आला तर ते करावं लागतं. आदेश मनाविरुद्ध असला तरी त्याचं पालन करावं लागत असल्याचं ते म्हणाले.
ओबीसीवरून मोदींवर निशाणा
देशाचे पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) भाषण करताना आपण ओबीसी (OBC) असल्याचं सांगतात पण ओबीसी नेत्यांना मात्र भाजपमध्ये मोठं पद नाहीये. त्यांच्या सरकारमध्ये किती ओबीसी लोक आहेत हा प्रश्न केला त्यानंतर ते म्हणून लागले देशात फक्त एकच जात आहे, ती म्हणजे गरिबी. मग असे असेल तर तुम्ही स्वतःला ओबीसी कसे काय म्हणता? असा सवाल राहुल गांधींनी केला. काँग्रेस रॅलीत संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसची सत्ता आली तर देशात जातीय जनगणना करणार असल्याचं आश्वसन दिलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.