Devendra Fadnavis: राहुल गांधींनी नागपुरात राजे- महाराजांचा अपमान केला : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी कोपरखळी मारली. काँग्रेस स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीतून राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam
Published On

राहुल गांधींनी राजे- महाराजांचा अपमान केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूरमध्ये काँग्रेस सभाही सुक्ष्म होती. काँग्रेस म्हणते की, है तयार हम, पण लोकं त्यांना ऐकायला तयार नसल्याची टीका करत फडणवीस यांनी राहुल गांधींना कोपरखळी मारली.

काँग्रेस स्थापना दिनाच्या (Congress 139th foundation day) पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीतून राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. देशात विचारधारेची लढाई चालू असल्याचा पुनोच्चार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केला. त्याचबरोबर त्यांनी राज घराण्यांवर देखील हल्लाबोल केला. त्यावर आता देवेंद्र फडणवीस जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Latest News)

राहुल गांधी यांच्या भाषणाला उपस्थिती फार कमी होती. काही लोक त्यांच्या भाषणाआधी निघून गेली होती. त्यांची थीम होती, है तयार हम. मात्र ते कशासाठी तयार आहेत? हे मला काही कळालं नसल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले. मात्र, लोकांना त्यांना ऐकायचं नाही. या देशामध्ये अनेक शूर राजे आणि राजघराणे होते. ज्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. आपलं स्वत: टिकून ठेवलं. राहुल गांधी म्हणाले, देशाच्या राजघराण्यांनी इंग्रजांसाठी साटंलोटं होतं. राजघराण्याचा अपमान करणं चुकीचं आहे. हे देशात सहन केलं जाणार नसल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी राहुल गांधींच्या भाषणावर दिली.

आमचं काही चुकलं तर कार्यकर्ते थेट आमच्याशी बोलतात. पण भाजपमध्ये तसं नाही. राजा-महाराजांच्या काळात, जसा आदेश यायचा तसा आदेश भाजपमध्ये येतो. देशाच्या हितासाठी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू जेलमध्ये गेले. भाजपने काय केलं ते सांगावं, असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसमध्ये सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे.

Devendra Fadnavis
Congress MahaRally: भाजपमध्ये गुलामी चालतेय; नागपुरात राहुल गांधींचा भाजपवर घणाघात

देशाचे सूत्र हे हिंदुस्तानातील जनतेच्या हातात असले पाहिजेत, अशी आमची विचारसरणी असल्याचं राहुल गांधी म्हणाले. देशातील जनतेकडे, महिलांकडे कोणतेच अधिकार नाहीत. कारण ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे. आम्ही तीच बदलली होती. पण आता भाजपला पुन्हा देशाला त्याच गुलामगिरीच्या काळात घेऊन जाययचं आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis
Fadnavis Convocation Ceremony: जपानकडून देवेंद्र फडणवीसांचा मोठा सन्मान; कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com