ravikant tupkar nirdhar parivartan yatra in shegaon saam tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar : शेगावसह बुलढाणा जिल्ह्याला विकासाचे मॉडेल बनविणार : रविकांत तुपकर

Ravikant Tupkar Latest Marathi News : शेगाव शहरात रविकांत तुपकर यांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहात बैलगाडीतून तुपकरांची मिरवणूक काढली.

संजय जाधव

Buldhana :

शेतकऱ्याचं पोरगं आता दिल्लीत पाठवायचंच असा निश्चय शेगाव येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या झालेल्या निर्धार मेळाव्यात (Nirdhar Parivartan Yatra) शेकडाे शेतक-यांनी तसेच नागरिकांनी केला. रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांच्या शेगावातील मेळाव्याला घाटाखालील नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. यावेळी तुपकर यांनी उपस्थितांना शेगावसह जिल्ह्याला विकासाचे मॉडेल बनविणार असल्याची ग्वाही दिली. (Maharashtra News)

गेल्या २२ वर्षांपासून घरादारावर तुळशीपत्र ठेवून चळवळीत काम करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे रविकांत तुपकर आहेत. शेतकरी, कष्टकरी, तरुण व सर्वसामान्य जनतेचा हा बुलंद आवाज यावेळी लोकसभेत पाठवायचा, असा निर्धार घाटाखालील रविकांत तुपकर यांच्या प्रमुख शिलेदारांनी संत गजानन महाराजांच्या पावनभुमित केला.

आता जातीपातीचे राजकारण बस झाले. विदर्भाची पंढरी असलेल्या संत नगरी शेगावसह बुलढाणा जिल्हा विकासाचे नवे मॉडेल बनले पाहिजे असा विकास या जिल्ह्याचा साधावा लागणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकजूट व्हावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी उपस्थितांना केले. यावेळी जेष्ठ नेते दयाराम वानखेडे यांनी मेळाव्यास उपस्थित राहून तुपकरांना शुभेच्छा दिल्या.

रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थिती शेगाव येथे घाटाखालील प्रमुख शिलेदारांचा निर्धार मेळावा धुमधडाक्यात पार पडला. शेगाव, खामगाव, जळगाव जामोद व संग्रामपूरमधील प्रमुख शिलेदारांनी या मेळाव्याला गर्दी केली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुरुवातीला शहरात समर्थकांनी मोठ्या उत्साहात बैलगाडीतून रविकांत तुपकरांची मिरवणूक काढली. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण व शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या लोकसभेतील परिवर्तनाची लढाई ताकदीने लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT