Ratnagiri Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident : कोकणात फिरायला आलेल्या पर्यटकांचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Ratnagiri Accident News : रत्नागिरीत दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • भाटी मिऱ्या येथे दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

  • एका तरुणाचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

  • जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल

  • अपघातानंतर परिसरात खळबळ, पोलिसांचा तपास सुरू

अमोल कलये, रत्नागिरी

रत्नागिरी शहरालगतच्या भाटी मिऱ्या येथे भीषण अपघात झाला आहे. दुचाकींची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्नागिरी शहरालगतच्या भाटी मिऱ्या येथे आज दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. दोन दुचाकींपैकी एक दुचाकी रत्नागिरी शहराकडून मिऱ्याच्या दिशेने जात होती, तर दुसरी दुचाकी मिऱ्याकडून रत्नागिरी शहरात येत होती. भाटी मिऱ्या येथील वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली.

स्थानिक तरुणासोबत दुचाकीवर मिळून तीन जण गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. जखमी तिघेही तरुण कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथून रत्नागिरीत फिरण्यासाठी आले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. जखमींपैकी एकाच्या दातासह जबडा शरीराबाहेर आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.

अन्य एक जण गंभीर जखमी असून तिसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलेनं अर्ध्यारात्री असं काही मागवलं की डिलीव्हरी बॉयही हादरला; ऑर्डर घेऊन घरी पोहोचताच जे घडलं त्यानं..., पाहा VIDEO

Nashik Tourism: नाशिकमध्ये फिरायला गेलात? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ५ किल्ल्यांना नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Famous Singer Death: इंडियन आयडल फेम गायकाचे ४३ व्या वर्षी निधन; संगीत विश्वावर शोककळा

धनंजय मुंडे भाजपात जाणार? दादांच्या दौऱ्याला दांडी, फडणवीसांसोबत हजेरी

SCROLL FOR NEXT