Ratnagiri Rain Update Saam TV
महाराष्ट्र

Ratnagiri Rain Update : खेड-चिपळूणमधील काही नद्यांनी धोका पातळी ओलांडली, शाळांना उद्या सुट्टी जाहीर; NDRFची 6 पथके दाखल

Rain Alert in Ratnagiri: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज खेड आणि चिपळूणमधील पूर परिस्थितीची संयुक्त पाहणी करत आढावा घेतला.

साम टिव्ही ब्युरो

Ratnagiri News : खेड आणि चिपळूणमधील पूर परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज खेड आणि चिपळूणमधील पूर परिस्थितीची संयुक्त पाहणी करत आढावा घेतला.

सरासरी पेक्षा जास्त  पाऊस पडत असल्याने खेड-चिपळूणमधील काही नद्यांनी धोका पातळी तर काहींनी इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूणमध्ये एनडीआरएफची पथके 6 ठिकाणी कार्यरत असून परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे. चिपळूण व खेड तालुक्यामधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं.

परशुराम घाटाचीही पाहणी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटामध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणीही जिल्हाधिकारी सिंह यांनी आज केली. परशुराम घाटात चिपळूणकडून मुंबईकडे एकेरी वाहतूक सुरु केलेली आहे. खेडकडून चिपळूणकडे येणारी लहान वाहने पाली कळंबस्ते मार्गे चिपळूणकडे सोडण्यात येत आहेत.

स्थलांतरीत कुटुंबे

चिपळूणमधील मिरजोळी जुवाड येथील 19 कुटुंबातील 65 जणांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे. ते सर्वजण नातेवाईकांच्या घरी आहेत. खेड तालुक्यात 45 कुटुंबातील 166 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.

यात खेड खामतळे झोपडपट्टीमधील 24 कुटुंबातील 90 जणांना तटकरी हॉल येथे , भोस्ते पुलाजवळील झोपडपट्टीतील 6 कुटुंबातील 30 जणांना डॉ. अलवी यांच्या इमारतीमधील शेडमध्ये, बोरघर (कातकरवाडी) येथील 4 कुटुंबातील 22 जणांना शेजारील वाडीतील घरांमध्ये, खारी (बहुतुलेवाडी) येथील 4 कुटुंबापैकी 14 जणांना शेजारील घरांमध्ये, नांदगाव (माळीवाडी) येथील एका कुटुंबातील दोघाजणांना शेजारील घरांमध्ये आणि चाटवमधील 3 कुटुंबातील 8 जणांना शेजारील घरांमध्ये स्थलांतरीत केले आहे.  (Latest Marathi News)

पूरपरिस्थितीमुळे खेड-दापोली, तळवट खेड- तळवट जावळी, भोस्ते-अलसुरे, खेड-शिर्शी (देवणापूळ), चिंचघर ते बहिरवली, आंबवली बाऊलवाडी (दरड पडल्याने) आणि शिव मोहल्ला ते शिव खुर्द (बौध्दवाडी क्र.१) रस्ते बंद झाले आहेत. शिवाय शिरगाव (बागवाडी), शिरगांव (पिंपळवाडी) शिरगाव (कोंडवाडी), शिरगाव (धनगरवाडी) यांचा संपर्क तुटलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT