Kalyan News : हृदयद्रावक! आईच्या डोळ्यांसमोर 6 महिन्यांची चिमुकली वाहून गेली, कल्याण-ठाकुर्लीदरम्यानची घटना

Kalyan News : एका ६ महिन्यांच्या छोट्या बाळाला घेऊन तिचे बाबा आणि त्या बाळाची आई देखील चालत होते.
Kalyan News
Kalyan NewsSaam TV
Published On

Kalyan News : कल्याणच्या पत्रिपुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर घडलेल्या घटनेने कल्याण डोंबिवलीसह सर्वच जण हळहळले. ट्रॅकवर उतरून चालत स्टेशन गाठण्याच्या प्रयत्नात अवघ्या सहा महिन्यांची चिमुकली हातातून निसटली आणि नाल्यात पडून वाहून गेले. रिषिका रुमाले असे या चिमुकलीचे नाव आहे.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच आपत्कालीन कक्षाचे कर्मचारी या चिमुरडीचा नाल्यात आणि खाडीत शोध घेत आहेत. मात्र नाल्यातील पाण्याचा वेग जास्त असल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत या चिमुरडीचा शोध लागू शकला नाही. कल्याणच्या पत्री पुलाजवळ आज दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वानाच मोठा धक्का बसला.

आज सकाळपासून कल्याण डोंबिवलीला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. मुळची हैद्राबादची असलेली योगीता रुमाले भिवंडी धामनगाव परिसरात राहणाऱ्या आपल्या आई वडिलांकडे प्रसूतीसाठी आली होती. दरम्यान रिषिका हिची जन्मापासून मुंबईतील रुग्णालयात ट्रीटमेट सुरू असल्याने मागील ६ महिन्यापासून ती आपल्या वडिलांकडेच राहत होती.

Kalyan News
Pune-Mumbai Train Cancelled: मुसळधार पावसाचा फटका, पुणे- मुंबई मार्गावरील सिंहगड, डेक्कन क्वीनसह 5 रेल्वे गाड्या रद्द

नेहमीप्रमाणे योगीता आपल्या वडिलांसमवेत बुधवारी सकाळी मुलीला घेऊन तपासणीसाठी गेली होती. दुपारी काम आटोपून ती अंबरनाथ लोकलने निघाली. मात्र पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती. ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान एका मागोमाग एक लोकल रांगेत उभ्या राहिल्या होत्या. बराच वेळ होऊनही लोकल जागेवरून हालत नसल्याने अखेर त्यातील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालत कल्याण स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला.

योगीता देखील आपल्या ट्रॅकमधून चालत येत होती. चिमुरड्या रिषिका हिला आजोबांनी छातीशी धरले होते. मात्र पुढे उभी असलेली लोकल नाल्याच्या अगदी जवळ असल्याने या लोकलच्या बाजूने असलेल्या अरुंद पाइप वरुन चालताना आजोबांचा पाय घसरला आणि त्यांच्या हातातील चिमुरडी थेट नाल्यात पडली. हातातील चिमुरडी पाण्यात पडलेली पाहताच योगीताने हंबरडा फोडला. (Latest Marathi News)

Kalyan News
Raigad rain : पेण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले; नागरिकांच्या घरात शिरलं पाणी

मात्र नाल्याच्या पाण्याचा प्रवाह खूपच जास्त असल्याने ही चिमुरडी पाण्यात वाहून गेली.घटनेची माहिती मिळताच कल्याण आणि डोंबिवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तर शिवसेना आपत्कालीन कक्षाची टीमदेखील मदतीसाठी पोचली. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत शोध घेऊन देखील चिमुरडीचा शोध लागू शकला नाही.

आईचा आक्रोश पाहून पाणावले इतरांचे डोळे...

आपल्या पोटचा गोळा पाण्यात पडल्याचे समजताच ती माय तर धाय मोकलून रडू लागली. आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी ती अक्षरशः त्या नाल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती. तर हा सगळा प्रसंग घडत असताना तो पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच अश्रूचा बांध फुटला. त्या आईच्या आर्त किंकाळीने सर्वांचेच काळीज अक्षरशः पिळवटून टाकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com