Ratnagiri ZP School Saam tv
महाराष्ट्र

ZP School : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळले; विद्यार्थी थोडक्यात बचावले

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्हा परिषदेची खेडच्या शिरवली गावातील असलेली शाळेची अवस्था अतिशय दयनीय आहे.

Rajesh Sonwane

अमोल कलये 

रत्नागिरी : जिल्हा परिषद शाळांची अवस्था अतिशय दयनीय झालेली पाहण्यास मिळते. या दरम्यान खेडमधील शिरवली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे छप्पर आज अचानक कोसळले. मात्र शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी नुकताच बाहेर गेल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. 

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा परिषदेची खेडच्या शिरवली गावातील असलेली शाळेची अवस्था अतिशय दयनीय आहे. या शाळेत पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गात ३० हून अधिक विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. या शाळांच्या वर्गखोल्यांचे छप्पर कौलांचे आहे. वर्गखोल्यांची अवस्था खराब असल्याने त्याची दुरुस्तीसाठी दुर्लक्ष केले जाते. जिल्हा परिषद शाळेच्या (Zp School) संदर्भात शासन सुस्त असून अनेक वेळा पाठपुरावा करूनही शाळा दुरुस्तीच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहे. यामुळेच आज शाळेचे छप्पर कोसळले आहे. 

मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय 
सदर घटना घडली यावेळी विद्यार्थी वर्गखोलीत नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. दरम्यान या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने संतप्त पालकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जोवर शाळा दुरुस्त होत नाही, तोवर मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचा निर्णय शिरवलीमधील ग्रामस्थांनी घेतला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

Maharashtra Live News Update: दिवाळीपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे पुण्यात मोठे "सर्च ऑपरेशन"

जेवणातील 'हे' पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये

Pune Crime: घायवळ प्रकरणानं वाढली सरकारची डोकेदुखी; गुन्हेगारीवर प्रश्न विचारताच भाजप खासदारानं काढला पळ| Video Viral

SCROLL FOR NEXT