Ratnagiri News Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri : घरात एकट्या असलेल्या मुलीसोबत घडले भयंकर; कुटुंबीय घरी आल्यानंतर हादरले

Ratnagiri News : घटना घडली यावेळी स्वरांगीचे आई- वडील शेतात कामासाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याने तिला तातडीने मदत मिळू शकली नाही, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला

Rajesh Sonwane

अमोल कलये 
राजापूर (रत्नागिरी)
: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घटना घडली यावेळी घरात कोणी नसताना मुलीच्या मदतीला कोणी नव्हते. यामुळे तिला लागलीच उपचार न मिळाल्याने तिचा घरात मृत्यू झाला. दरम्यान कुटुंबीय सायंकाळी घरी आल्यानंतर मुलीला पाहून आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. यानंतर घटना उघडकीस आली. 

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली गावातील स्वरांगी संदीप गिजम (वय १३) असे घटनेत मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण राजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार ही दुर्दैवी घटना त्यावेळी घडली, जेव्हा स्वरांगीच्या घरात कोणीही नव्हते. घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेले होते. घरात एकट्या असलेल्या स्वरांगीचा पंख्याच्या वायरला हात लागला आणि तिला विजेचा धक्का बसला. यामुळे ती फेकली गेली. 

कुटुंबीय घरी आल्यानंतर घटना उघडकीस 

दरम्यान घटना घडली यावेळी स्वरांगीचे आई- वडील शेतात कामासाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याने तिला तातडीने मदत मिळू शकली नाही, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर सायंकाळी घरातील मंडळी घरी आली असता त्यांना स्वरांगी हि खाली पडलेली दिसून आली. त्यांनी लागलीच तिला उचलत रुग्णालयात नेले. मात्र तो पर्यंत उशीर झालेला होता. स्वरांगीच्या मृत्यूने आई- वडीलानी एकच आक्रोश केला. 

कुटुंबावर दुःखाचा डोंगर 
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका क्षणात होत्याचे नव्हते झालेल्या या घटनेमुळे गिजम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धाऊलवल्ली गावात शोककळा पसरली असून, निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेने विजेच्या उपकरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दुसऱ्याशी लग्न ठरल्याचा राग, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडवर चाकूने केले सपासप वार

LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद होणार, पुण्यातील दाम्पत्यानं बनवलं 'पर्जन्यमापक यंत्र'

मानखुर्दमध्ये क्रेन कोसळली, मुंबईची वाहतूक 22 तास ठप्प

कामगारांच्या नोकरीवर टांगती तलवार? कामगारांवर आता कायद्यानं कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT