Sangli Shocking: आधी गुप्तांग कापलं मग जमिनीत अर्धवट पुरलं, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर; साताऱ्यात खळबळ

Sangli Crime Case: संदिप रिटे या तरुणाची निर्घृण हत्या करून, त्याचा मृतदेह अर्धवट जमिनीत पुरण्यात आल्याची घटना ठाकूरकी गावात उघड झाली आहे. विशेष म्हणजे, हत्या करण्यापूर्वी त्याचे गुप्तांग कापण्यात आले होते.
Sangli Crime
Sangli CrimeSaam Tv
Published On

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक हत्या उघडकीस आली आहे. युवकाचे गुप्तांग कापून हत्या केली असून, आरोपीने त्याचा मृतदेह अर्धवट जमिनीत पुरला. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता, हत्या करण्यापूर्वी त्याचे गुप्तांग कापल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

संदिप रिटे असे मृत तरूणाचे नाव आहे. तो साताऱ्यातील फलटण येथील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी युवकाच्या पत्नीनं पती बेपत्ता झाली असल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.युवकाचा शोध पोलिसांकडून सुरूच होता. दरम्यान, साताऱ्यातील फलटण येथील ठाकूरकी या गावात एकाचा अर्धवट पुरलेला मृतदेह गावकऱ्यांना आढळला.

Sangli Crime
Mumbai Local: तिकीट तेच सगळ्या लोकल AC, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मुंबईच्या लाईफलाईनचा मास्टरप्लान

ग्रामस्थांनी तातडीने फलटण पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खोदकाम केल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासात खून करण्याआधी त्याचे गुप्तांग कापण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास केला असता, बेपत्ता युवत संदिप असल्याचं स्पष्ट झालं.

याची माहिती त्याच्या पत्नी आणि कुटुंबाला समजताच त्यांनी हंबरडा फोडला. हा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणाने केला, याचा तपास फलटण पोलिस करत असून, अद्याप आरोपींचा किंवा कारणाचा शोध लागलेला नाही. या घटनेची माहिती समोर येताच गावात खळबळ उडाली आहे.

Sangli Crime
Shocking: 'त्याने माझा वापर करून सोडलं', बड्या खासदारावर उच्चशिक्षित महिलेचा गंभीर आरोप; पोस्ट करत पत्ते उघड

कोल्हापुरात बेकायदेशीर मांजरी जप्त

कोल्हापूरच्या रंकाळा स्टॅंड परिसरातील आयरेकर गल्लीमध्ये राहणाऱ्या प्रदीप बुलबुले यांनी आपल्या घरात बेकायदेशीररीत्या तब्बल ३५ पाळीव मांजरे पाळल्याची तक्रार कोल्हापूर महापालिकेकडे प्राप्त झाली होती. या प्रकारामुळे घरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त कचरा साचला होता आणि परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ कारवाई करत बुलबुले यांच्या घरी धाड टाकली. या कारवाईदरम्यान तीन मांजरे पकडण्यात आल्या, तर उर्वरित मांजरे पळून गेली. घरातील तब्बल २ ट्रॅक्टर भर कचरा बाहेर काढण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com