भाजपला लोकसभेत ८५० जागा का हव्यात? डिलिमिटेशन विधेयकावर राहुल गांधी काय म्हणाले?

Delimitation Row: लोकसभेच्या जागा ८५० करण्याची गरज काय? डिलिमिटेशन विधेयकावर राहुल गांधींनी भाजपला सवाल केला. मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकशाहीवरील संभाव्य परिणामांबाबत राहुल गांधी काय म्हणालेत?

लोकसभेच्या जागांची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावाबाबत राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालय, 'इंदिरा भवन' येथे पत्रकार परिषद घेतली. मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) मुद्द्यावरून भाजपवर राहुल गांधींनी निशाणा साधला. हा केवळ जागा वाढवण्याचा विषय नसून, देशाच्या निवडणूक नकाशाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महिला आरक्षण आधीच लागू झाले आहे. लोकसभेच्या विद्यमान ५४३ मतदारसंघांमध्येच लागू केले जाऊ शकते, त्यामुळे जागांची संख्या वाढवून ८५० करण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लोकसभेच्या ८५० जागा वाढवल्यानं भाजप निवडणुकीचा नकाशा बदलेल.त्यामुळे लोकशाहीला धोका आहे.

८५० जागांचा प्रस्ताव भाजपला निवडणूक मतदारसंघांच्या सीमा पुन्हा आखण्याची एक मोठी संधी उपलब्ध करून देईल. हे एखाद्या 'कोरा कॅनव्हास' (रिकामी चित्रपट) प्रमाणे असेल. त्यांच्या मते, ज्याप्रमाणे एखादा कलाकार कोऱ्या कॅनव्हासवर स्वतःच्या पसंतीचे कोणतेही चित्र रेखाटू शकतो, त्याचप्रमाणे जागांच्या संख्येत होणारी वाढ सरकारला निवडणूक नकाशा नव्याने घडवण्याची अधिक मोठी संधी देईल. भाजप आपल्या मनाप्रमाणे जागांची मतदारांची संख्या कमी जास्त करू शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.