Sangli BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूका स्वबळावर; भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत कार्यकर्ते आग्रही

Sangli News : आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने सांगली जिल्या भाजप कार्यकर्त्यांची कोअर कमिटीची बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली
Sangli News
Sangli NewsSaam tv
Published On

सांगली : राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातलेल्या आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याची आग्रही मागणी सांगलीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. मात्र याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल, असे भाजपचे नेते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची तयारी सुरु आहे. त्याच अनुषंगाने सांगली जिल्या भाजप कार्यकर्त्यांची कोअर कमिटीची बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत भाजप कारकर्त्यानी सर्व निवडणूक स्वबळावर घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर आता वरिष्ठ नेत्यांकडून काय निर्णय होईल, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

Sangli News
IRCTC Rule Change: आता आधार अनिवार्य, तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

भाजपच्या मतांचा टक्का वाढावा 

मंत्री विखे पाटील म्हणाले, आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा. त्यासाठी कामाला लागा. भाजपच्या मतांचा टक्का वाढवावा. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना होणार आहे. त्यावर सुरुवातीपासून लक्ष ठेवा. नंतर त्यात बदल होणार नसल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

Sangli News
Sangli Shocking: आधी गुप्तांग कापलं मग जमिनीत अर्धवट पुरलं, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर; साताऱ्यात खळबळ

आदेश येईपर्यंत कामाला लागा 

अलमट्टी धरणाच्या उंची वाढीस विरोध आहे. त्याबाबत अभ्यासू, तज्ञांची बैठक मुंबई घेऊ. गोदावरी स्वच्छतेप्रमाणेच कृष्णा नदी स्वच्छतेबाबत काय उपाययोजना करता येतील यासाठी प्रयत्न करू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवा. पक्षाचे वरिष्ट काय आदेश देतील, तोपर्यंत तुम्ही कामाला लागा. सांगली महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये आपले सर्वाधिक सदस्य निवडून आणावेत, असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com