
आयआरसीटीसी (IRCTC) हे रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी अॅप आहे. या अॅपवरुन तुम्ही कधीही तिकीट बुक करु शकतात. आयआरसीटीसीने तात्काळ तिकीटाच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे. यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. आता तुम्ही काही मिनिटांतच तात्काळ तिकीट बुक करु शकतात.
तात्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी अनेक अडचणी येतात. तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी एक अडचण येते ती म्हणजे बनावट तिकीट. बनावट तिकीटांमुळे अनेकांना नुकसान होते. त्यामुळे आता नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
रेल्वे तिकीटाच्या नियमात बदल (Railway Tatkal Ticket Rule Change)
रेल्वे विभागाने तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार वेरिफाय करणे अनिवार्य आहे. हा नवीन नियम २०२५ च्या अखेरपर्यंत लागू होऊ शकतो. आरआरसीटीसीच्या पोर्टलवरुन तात्काळ तिकीट बुक करणाऱ्या युजर्सला फायदा होणार आहे.
काय बदल झाले?
भारतीय रेल्वेने तिकिट बुकींगमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट तिकीट बुकिंगला आळा घालण्यासाठी नियमांमध्ये बदल केले आह. आता तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार ऑथेंटिकेशन गरजेचे आहे.
आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तात्काळ तिकीट मिळण्याची शक्यता जास्त असेल. बनावट तिकीट बुकिंगला आळा बसेल. याचसोबत तात्काळ तिकीट बुकिंगसाठी जास्त वेळदेखील मिळणार आहे.
IRCTC वरुन तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? (How To Book Tatkal Ticket On IRCTC)
सर्वात आधी तुम्हाला irctc.co.in या वेबसाइटवर जायचे आहे त्यानंतर लॉग इन करायचे आहे. यानंतर प्रवासाची तारीख, स्टेशन आणि क्लास सिलेक्ट करायचा आहे. यानंतर तात्काळ तिकीट हा ऑप्शन निवडा. यानंतर तुमचे नाव, सिंग, सीट नंबर, मोबाईल नंबर ही सर्व माहिती भरा. यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. यानंतर पेमेंट करा. यानंतर तुम्हाला तिकीट कन्फर्म झाल्यानंतर एसएमएसद्वारे माहिती मिळेल. एसी क्लाससाठी सकाळी १० वाजता तर नॉन एसी क्लाससाठी ११.०० वाजता तिकीट बुक करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.