डीलिमिटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून, ते आता संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजुरीसाठी मांडले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे विधेयक मंजूर व्हावे यासाठी दोन तृतीयांश बहुमताची जुळवाजुळव सरकारकडून सुरू आहे. विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाही या विधेयकाला पाठिंबा असल्याचे त्यांच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे, विधेयकात काय तरतुदी आहेत, हे पाहून भूमिका घेतली जाईल, असे प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, शरद पवार यांच्या पक्षाचा पाठिंबा असल्याच्या चर्चेनंतर महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांकडूनही टीका होत आहे. तर या मुद्द्यावरून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात इंडिया आघाडीत असेल का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर आता स्वतः राहुल गांधी यांनीच स्पष्ट उत्तर दिले आहे.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज डीलिमिटेशन विधेयकाबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यात इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या, विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत आणि विधेयकाला पाठिंबा दिला तर त्यांच्या इंडिया आघाडीतील स्थानाबाबत राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी विधेयकाला पाठिंबा दिला तरी त्यांचे इंडिया आघाडीतील स्थान कायम राहणार असल्याचं राहुल यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.