Ratnagiri Airport Project Saam
महाराष्ट्र

रत्नागिरीकरांचं स्वप्न पूर्ण होणार; विमानातून लवकरच प्रवास करता येणार, मंत्री उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

Ratnagiri Airport Project: मार्च २०२६ पर्यंत रत्नागिरी विमानतळाचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती. नवीन टर्मिनल बिल्डिंगच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण देण्याचा प्रयत्न करणार - मंत्री उदय सामंत.

Bhagyashree Kamble

  • रत्नागिरीत विमानतळ लवकरच सुरू होणार.

  • सामान्यांसाठी विमानातून प्रवासाची सोय.

  • मंत्री उदय सामंतांकडून माहिती.

रत्नागिरीकरांचं लवकरच विमान प्रवासाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या काही महिन्यांत रत्नागिरी विमानतळावरून विमान सेवा सुरू होणार आहे. लवकरच या विमानतळाचे काम पूर्ण होईल. यामुळे रत्नागिरीबाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, शेतकऱ्यांची मुलं - मुली, सामान्यांना विमानातून प्रवास करण्याचा लाभ मिळणार आहे.

याबाबत मंत्री उदय सामंत म्हणाले की, मार्च २०२६ अखेरपर्यंत रत्नागिरी विमानतळाचं काम पूर्ण होईल, अशी माहिती आहे. याबाबतचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. टर्मिनल बिल्डिंगच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली, असं उदय सामंत यांनी सांगितलं. दरम्यान, काल मतचोरीच्या आरोपांबाबत काहींनी केलेल्या वक्तव्यांवर उत्तर देताना सामंत म्हणाले की, 'रत्नागिरीकरांनीच त्यांना उत्तर दिलं आहे. सलग ३ वेळा त्यांचं पराभव झालं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. काहीही निमित्त शोधून माझ्याविरोधात बोलणं ही त्यांची भूमीका आहे', असं सामंत म्हणाले.

राजन तेलींच्या पक्षप्रवेशाबाबत उदय सामंत काय म्हणाले?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे नेते राजन तेली यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दसरा मेळाव्याच्या दिवशी प्रवेश केला. त्यानंतर जिल्हा बँकेतल्या कर्ज प्रकरणांमध्ये अनियमित्ता आहे. तेली यांच्यासह आठ जणांना या संदर्भातील नोटीस आली आहे. म्हणूनच हा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली. याबाबत विचारले असता उदय सामंत यांनी या चर्चेचा पूर्णपणे नकार दिला. राजन तेली यांनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण प्रकरणाबाबत खुलासा केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पक्ष वाढीसाठी पक्षप्रवेश झाल्याचे या वेळेला सामंत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC News: ‘आपली एसटी’ कुठंय? आता प्रवाशांना मिळणार MSRTC बसेसचं रिअल-टाइम अपडेट्स

IND Vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी-२० सीरीजसाठी हार्दिकला वगळलं, नेमकं कारण काय?

GK : भारतामधील सर्वात जास्त शिकलेले राज्य कोणते आहे? जाणून घ्या

Shocking : एकाच तरुणीला दोघांनी ब्लॅकमेल करून केला बलात्कार, शिक्षकाच्या काळ्या कृत्यामुळे परभणी हादरली

खरंच मध कधीच खराब होत नाही का?

SCROLL FOR NEXT