Jayant Patil On Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Jayant Patil News: 'ज्या शाळेत तुम्ही आता दाखल झाला, त्याचे मुख्यध्यापक शरद पवारांकडून ट्युशन घेतात', पाटलांची अजित पवारांवर टीका

Satish Kengar

Jayant Patil On Ajit Pawar:

'ज्या शाळेत तुम्ही आता दाखल झाला, त्याचे मुख्यध्यापक शरद पवारांकडून ट्युशन घेतात', राष्ट्रवादीच्या मासिकातून शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सणसणीत टोला लगावला आहे.

या मासिकेत 'एकसंघ होऊन पवारसाहेबांना ताकद देण्याचं काम करूया', अशा आशयाखाली एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये आपलं मत मांडताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, ''आमच्यातनं गेलेली लोकं पवार साहेबांच्या कर्तृत्वावर आता प्रश्न निर्माण करायला लागलेत. पवार साहेब ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी पवार साहेब स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कर्तबगारीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर तीनवेळा म्हणजे एकूण चारवेळा पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.''

त्यांनी पुढे लिहिलं आहे की, ''पवार साहेबांबरोबर होतात, त्यावेळी तुम्हाला या गोष्टी सुचल्या नाहीत. आता मात्र सुचायला लागल्यात. मी एवढंच सांगेन की जिस स्कूल में आप अभी अभी दाखिल हुए हैं, उस स्कूल के प्रिन्सिपल भी पवार साहब के पाससे ट्यूशन लेते हैं. पवार साहब की उंगली पकड़कर राजनीती मे आया हूँ, आलं का लक्षात? त्यामुळं कुठल्या शाळेत जायचं याचा तरी अभ्यास, विचार करायला पाहिजे होता.'' (Latest Marathi News)

दुष्काळाच्या प्रश्नावरून सरकारला केलं लक्ष्य

दुष्काळाच्या प्रश्नावरून सरकारला लक्ष्य करत जयंत पाटील यांनी लेखात लिहिलं आहे की, ''या दुष्काळामुळे आम्ही सरकारकडं मागणी केली, की टँकरची व्यवस्था करा, चारा छावण्या उभारा. दुष्काळ जाहीर करा. पण सरकार अजून लक्ष द्यायला तयार नाही. महागाई किती वाढलीय हे मी आपल्याला सांगायची गरज नाही. पण महागाईला तोंड देणाऱ्या सामान्य जनतेनं पेट्रोल-डिझेलच्या ऐवजी सीएनजीकडं आपला वापर वळवला. दुष्काळातल्या आपल्या असंख्य समस्यांना सरकारनं तोंड दिलं पाहिजे. सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे.''

ते म्हणाले आहेत की, ''सरकारनं इतर कार्यक्रम थांबवून जरा दुष्काळाचा कसा मुकाबला करायचा ही भूमिका सरकारनं ठेवली पाहिजे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची उजाडलाय, अजूनही पाऊस नाही. धरणांत पाणी नाही. अनेक भागांत पाण्यासाठी वणवण दिसायला लागलेली आहे.''

पाटील म्हणाले, ''शासन आपल्या दारी ही भूमिका घेऊन सरकार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सरकारी कर्मचारी आणि तिथल्या गरजू लोकांचे मोठ्या प्रमाणावर मेळावे भरवले जातायंत. चार चार, सहा-सहा महिने थांबवलेले दाखले देण्याचा कार्यक्रम तिथं केला जातोय. पण, सरकारला अजून हे माहित नाहीये, कदचित कल्पना नसेल, शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या सरकारला हे माहिती आहे की नाही हे माहीत नाही, की आपल्या दारात आता दुष्काळाचं संकट आलेलं आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT