प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदाेलन
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदाेलन 
महाराष्ट्र

आता तरी जागे व्हा! दिवाळीची पहिली अंघोळ रस्त्यांवरील खड्यात

विजय पाटील

सांगली : दिवाळीच्या पार्श्वभुमीवर चांगले रस्ते मिळावेत यासाठी केलेले प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडल्याने आज (मंगळवार) राष्ट्र विकास सेनेच्या वतीने इस्लामपूर महामार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसून अंघोळ करून अनोखे आंदोलन केले.

सांगली शहर आणि ग्रामीण भागातील मृत्यूचे सापळे बनलेले रस्ते खड्डे मुक्त करा या मागणीसाठी राष्ट्र विकास सेना गेली महिना झालं वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चे निदर्शने करूनही दखल न घेतल्याने आज आक्रमक झाली.

प्रशासन आणि जिल्हा परिषद अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी दिवाळीची पहिली अंघोळ सांगली इस्लामपूर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात बसून अंघोळ करून अनोखे आंदोलन केले. हे आंदाेलन राष्ट्र विकास युवा सेनेचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी केले. ते म्हणाले या भागात सातत्याने छाेटे माेठे अपघात हाेताहेत. तरी प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे आंदाेलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourist Places : उन्हाळ्यात फिरण्यासाठी नयनरम्य ठिकाणे; रत्नागिरीमधील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट द्या

Ramdas Athawale : भाजप खरंच संविधान बदलणार का? रामदास आठवलेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

Weight loss Tips: सडपातळ व्हायचंय? जीवनशैलीत करा हे बदल

Today's Marathi News Live : परभणीत रोजगार हमीतील संतप्त मजुरांनी पंचायत समिती कार्यालयात प्राशन केलं कीटकनाशक

Madhuri Dixit: क्या खुब लगती हो; धकधक गर्लचा ट्रेडिशनल लेहंगा लूक!

SCROLL FOR NEXT