Ratnagiri Tourist Places : उन्हाळ्यात फिरण्यासाठी नयनरम्य ठिकाणे; रत्नागिरीमधील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट द्या

Bhatye Beach Ratnagiri : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी सुंदर समुद्रकिनारा शोधत असाल तर भाट्या अतिशय उत्तम आहे. येथे तुम्ही विविध खेळ देखील खेळू शकता.
Ratnagiri Tourist Places
Ratnagiri Tourist PlacesSaam TV

सध्या उन्हाळा सुरू आहे आणि सर्व शाळांना देखील सुट्टी लागलीये. त्यामुळे अनेक व्यक्ती पाणी असलेल्या ठिकाणी फिरण्यासाठी जाणे पसंत करतात. मुंबईमधील बरेच समुद्रकिनारे हे दूषित झालेत. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी रस्त्नागिरीमधील एक सुंदर समुद्रकिनाऱ्याची माहिती आणली आहे.

Ratnagiri Tourist Places
Vasai Bhuigaon Beach : समुद्र किनारी कार फिरविण्याचा स्टंट पर्यटकांच्या अंगलट

भाट्या समुद्रकिनारा

रत्नागिरीमधील भाट्या समुद्रकिनारा हा सर्वाधिक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. मुंबईसह अन्य शहरांमधील व्यक्ती येथे फिरण्यासाठी येतात. तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी सुंदर समुद्रकिनारा शोधत असाल तर भाट्या अतिशय उत्तम आहे. येथे तुम्ही विविध खेळ देखील खेळू शकता. पाण्याचा आनंद घेता घेता तुम्ही किनाऱ्यावर क्रिकेटसह विविध खेळ खेळू शकता.

पत्ता काय?

भाट्या या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी तुम्हाला रत्नागिरी गाठावी लागले. रत्नागिरीमध्ये पोहचल्यावर तेथून तुम्ही बाय रोड येथे पोहचू शकता. दीड किलोमीटर अंतरावर भाट्या नावाचं छोटंसं गाव आहे. येथील रिक्षाच्या सहाय्याने तुम्ही गावात आणि समुद्रकिनाऱ्यावर जाऊ शकता.

1.5-किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा

भाट्या समुद्रकिनाऱ्याची लांबी 1.5-किलोमीटर इतकी आहे. हा समुद्रकिनारा येथील शांतता आणि नयन दिप्य दृष्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे एक रोहिनूर पॉइंट देखील आहे. तेथून सुर्योदय आणि सुर्यास्त कमालीचा दिसतो.

भाट्या बीचवर गेल्यानंतर तुम्हाला तेथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची देखील सोय असणार आहे. तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर अनेक फूड स्टॉल मिळतील. तसेच गावामध्ये अनेक ठिकाणी फार्महाऊस आणि गेस्ट हाऊस आहेत.

Ratnagiri Tourist Places
Beaches to visit in summer : उन्हाचा कहर अन् फिरण्याची लहर; मग 'या' सुंदर समुद्रकिनारी नक्की भेट द्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com