Raosaheb Danve Saam Tv
महाराष्ट्र

'लोकशाहीला न शोभणारं कालचं कृत्य'- रावसाहेब दानवेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

लक्ष्मण सोळुंके

औरंगाबाद: राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी चांगलंच आक्रमक पवित्रा घेतल्यावर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. यानंतर या दोघांना भेटायला गेलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला (attacks) केल्याची घटना काल रात्री घडली. सोमय्या यांच्या हनुवटीला यामध्ये जखम झाली आहे, त्यांनी वांद्रे पोलीस (Police) स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सोमय्यांवरील हल्ल्यावरुन भाजपा (BJP) आता आक्रमक झाली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील सोमय्या यांच्यावर हल्ल्याचा निषेध करत ठाकरे सरकारवर (government) जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात गुंडगिरीच्या घटना बघता लोकशाही धोक्यात आली आहे याचे उदाहरण काल बघायला मिळाले आहे, असे रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले आहेत. राणा दाम्प्त्याच्या मातोश्रीवर धडक देण्याच्या भूमिकेचे समर्थन करता येणार नाही. पण त्यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची मागणी केली होती. त्यात चुकीचं काय होते? हनुमान चालीसाला इतका विरोध कशासाठी? आणि ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते गोंधळ घालत होते ते बघता विरोधकांची मुस्कटदाबी करणं हेच या सरकारचे उद्दिष्ठे बनले आहे. ही अशी परिस्थिती आणीबाणीच्या काळात बघायला मिळाली होती. पण जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जनताच याचे उत्तर देईल, असे रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले आहे.

हे देखील पहा-

ज्या राणा दाम्पत्याने मातोश्रीवर धडकण्याची भूमिका घेतली त्यांना पोलीस नोटीस देतात. पण त्यांच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी काहीच केले नाही. त्यांच्याविरोधामध्ये एक देखील तक्रार दाखल केली जात नाही. किरीट सोमय्यांच्या गाडीवर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला होतो. याबाबत देखील पोलीस तक्रार दाखल करत नाहीत. महाराष्ट्र पोलिसांनी एवढे नाव कमावले. पण त्यांना बदनाम करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. पोलिसांना पुढे करुन राजकारण करण्याचा धंदा राज्य सरकार करत आहे, असे दानवे म्हणाले. राणा दाम्पत्य आणि अण्णा हजारे यांची तुलना मी करणार नाही. पण अण्णा हजारे जेव्हा काही प्रश्नांना घेऊन उपोषणाला बसत असतात, तेव्हा सरकार त्याची दखल घेऊन सरकारचे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करुन तोगडा काढतात हे आपण बघितलं आहे.

राणा दाम्पत्य लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांचे म्हणणं सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन जाणून घेतले असते, तर काय बिघडले असते. सरकारच्या प्रतिनिधींनी राणा दाम्पत्याची भेट घेतली असती आणि त्यांच्याशी चर्चा केली असती तर प्रकरण सोडवता आले असते. पण विरोधकांची केवळ मुस्कटदाबी करुन त्यांची भूमिका हाणून पाडण्याचे काम सरकार करत आहे. आणीबाणी काळात जनता मुकदर्शक होती. मात्र वेळेवर त्यांनी बदला घेतला, तसाच असा बदला जनता घेईल असेही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Maharashtra News Live Updates : पुण्यात उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT