शिवसेनेचा मोर्चा म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न; भाजप आमदाराचा टोला

शिवसेनेच्या लोडशेडिंग विरोधातील मोर्चावर भाजप आमदारांची टीका
Mla Ganpat Gaikwad
Mla Ganpat Gaikwadप्रदीप भणगे
Published On

कल्याण : मलंगगड परिसरात सुरू असलेल्या अघोषित लोडशेडिंग (load shedding) विरोधात शिवसेनेनं आज कल्याणच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. हा मोर्चा म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री किंवा अजितदादांच्या बंगल्यावर मोर्चा काढावा, असा खोचक टोला कल्याण पूर्वेचे भाजपचे (BJP) आमदार गणपत गायकवाड यांनी लगावला आहे.

हे देखील पहा-

सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच सरकारच्या विरोधात मोर्चा काढतात. त्यामुळे आपलं सरकार (Government) काही काम करत नाही, हे त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही समजलं आहे, अशी टीका गणपत गायकवाड यांनी यावेळी केली आहे. तसेच २०१४ पूर्वी केंद्रात आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची (NCP) सत्ता असताना लोडशेडिंग होत होती, पण २०१४ साली भाजपची सत्ता आल्यानंतर लोडशेडिंग बंद झाले, असंही गायकवाड म्हणाले.

Mla Ganpat Gaikwad
तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर काय?

केंद्राने इंधनाचे दर कमी केले, तेव्हा राज्यातही दर कमी व्हायला पाहिजे होते. मात्र ते राज्याने केले नाहीत, आणि काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं, असे प्रकार राज्यातले सत्ताधारी करत असल्याचा आरोपही (Allegations) गणपत गायकवाड यांनी केला आहे. तसेच ठाकरे सरकार अपयशी ठरलेलं आहे, असं म्हणत ठाकरे सरकारचे लोकं त्यांच्याच सरकारविरोधात आंदोलनं करतात याचा आनंद वाटतोय, कारण कार्यकर्त्यांनाही समजतंय की सरकार अपयशी आहे, असा टोला गणपत गायकवाड यांनी यावेळी लगावला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com