ranjitsinh naik nimbalkar & ramraje naik nimbalkar saam tv
महाराष्ट्र

'त्यांची खासदारकी घालवायला मी मोदी किंवा अमित शहा नाही'

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतीच रामराजेंवर टीका केली हाेती. त्यास राजेंनी प्रत्युत्तर दिले.

ओंकार कदम

सातारा : मी मोदी (narendra modi) आहे की अमित शहा (amit shah) ? राज्यात (maharashtra) आणि देशात (india) काही घडल तर पवार साहेबांवर (sharad pawar) टीका होते आणि (satara) जिल्ह्यात काही घडल तर माझ्यावर टीका होते. तीन पिढ्या हेच चालले आहे असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) यांच्या टीकेला विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांनी उत्तर दिले. (ramraje naik nimbalkar latest marathi news)

माझ्या बदनामी करण्यापाठीमागे रामराजेंचा हात आहे असा आरोप काही दिवसांपुर्वी भाजपाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंवर केला होता. याला रामराजेंनी त्यांच्या हटके स्टाईलमध्ये उत्तर देत खासदार रणजितसिंह यांच्यावर खोचक टीका केली आहे.

रामराजे म्हणाले माझ्यावर आरोप करणारे ३ पिढ्या माझ्यावर आरोपच करत आले आहेत. देशात आणि राज्यात काही घडलं तर शरद पवारांवर टिका होते आणि जिल्ह्यात काही जरी घडलं तरी माझ्यावरच टिका होते अशी परिस्थिती आहे. ते उच्च पातळीवर काम करतात मात्र वृक्षारोपणा पेक्षा त्यांना त्यांच्यावरचे आरोप महत्वाचे वाटत असतील असे सांगत त्यांना निवडुन दिले आहे.

त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने का‌म करावे. त्यांची खासदारकी घालवायला मी मोदी किंवा अमित शहा नाही. कोणामुळे पद मिळत नाही आणि जात पण नाही. त्यांनी (खासदार रणजितसिंहांनी) मला खुप त्रास दिला आहे असे रामराजेंनी नमूद करीत मी त्यांना महत्व देत नाही तुम्ही (माध्यमांनी) देखील देऊ नका असे राजेंनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur: कोल्हापूरमध्ये चाललंय काय? हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना मारहाणीचे सत्र सुरूच, आणखी एक धक्कादायक VIDEO समोर

Ola- Uber: 'राईड कॅन्सल केली तर...'; ओला-उबर, रॅपिडोसह सर्व ॲप आधारित चालक वठणीवर येणार, नव्या कायद्यात काय?

BMC Election : बीएमसीत आमचे वाघ... जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना, निवडणुकीत कुणाला झटका बसणार?

Prarthana Behere: पवित्र रिश्ता फेम प्रार्थना बेहरेविषयी या गोष्टी माहित आहेत का?

SAIL Recruitment: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी; महिन्याला १.६० लाखांचं पॅकेज; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT