Devendra Fadnavis On Ram Temple Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: अयोध्येतील राम मंदिर ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On Ram Temple: अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis On Ram Temple:

अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण असल्यामुळे आपण सर्व रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येला जाऊया, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

अयोध्या येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण होऊन गर्भगृहात राम लला विराजमान होणाऱ्या क्षणाचे साक्षीदार होत असल्याचा अभिमान आहे. हा क्षण रामनगर येथील राम मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनवर बघण्यासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय इतिहासात २२ जानेवारी हा महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राम जन्मभूमी मुक्त करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. तसेच स्वातंत्र्यानंतर यासाठी संकल्प करण्यात आला. राजकीय स्वातंत्र्यासोबत आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे अयोध्या येथे भव्य राम मंदिर पूर्ण झाले आहे.  (Latest Marathi News)

कारसेवकांचे बलिदान तसेच कोठारी बंधू यांनी भगवा प्रस्थापित करण्यासाठी केलेला संघर्ष अतुलनीय होता. सर्वांच्या त्यागातून व बलिदानातून आज भव्य राम मंदिर निर्माण झाले आहे. त्यामुळे राम ललाचे दर्शन घेण्यासाठी सर्वांना अयोध्येला जायचे आहे. त्यासाठी आवश्यक व्यवस्था करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी रामनगर येथील मंदिराला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेचा क्षण सर्वांना अनुभवता यावा तसेच या क्षणाचे साक्षीदार होता यावे, यासाठी या परिसरात एलईडी स्क्रीनद्वारे या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सुमारे तीन तास चाललेल्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी कारसेवक म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

Maharashtra Live News Update : पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो

PF Withdrawal: कामाची बातमी! या UPI App मधून काढता येणार PF चे पैसे, वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT