Raksha Khadse daughter molestation case  Saam Tv News
महाराष्ट्र

Raksha Khadse Daughter : रक्षा खडसे यांच्या लेकीची छेडछाड प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

Raksha Khadse Molested : आता या प्रकरणात पाच जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Prashant Patil

जळगाव : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. यानंतर आता या प्रकरणात पाच जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

या घटनेनंतर मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य मुलींचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रुपाली चाकणकर यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. 'ही लोकं, माणसाच्या कळपातील विकृती आहेत, यांचे चेहरे आता समोर आणले पाहिजे', असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

राज्य महिला आयोगाला फार मोठी गरिमा आहे. कोण काय बोलत असेल, तर तो प्रश्न तुम्हीच त्यांना विचारा. अशा बाप असलेल्या व्यक्तींना चिरडून काढले पाहिजे पण आपण न्यायाच्या चौकटीत आहोत. कायद्यामुळे हात बांधले जातात अन्यथा आम्ही कडक कारवाई केली असती, असंही रुपाली चाकणकरांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT