Sanjay Raut  Saam Tv
महाराष्ट्र

राज्यसभेची निवडणूक आम्हीच जिंकणार; भाजपने यात पैसा वाया घालवू नये : संजय राऊत

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सहाव्या जागेसाठी आपली ताकद लावून दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकांच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची भाजपसोबतची (BJP) बोलणी फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सहाव्या जागेसाठी आपली ताकद लावून दिली आहे. अशातच राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे हा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप अपक्षांवर दबाव आणतंय. ईडी, सीबीआय सारख्या तपासयंत्रणांद्वारे अपक्ष आमदारांना भीती दाखवली जातेय, असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

इतकंच नाही तर, भाजपने कितीही घोडेबाजारी केली, कितीही पैसा ओतला, तरीही सहावी जागा महाविकास आघाडीच जिंकणार आहे. असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. (Rajya Sabha Election Latest News)

काय म्हणाले संजय राऊत?

मुंबईत माध्यमांसोबत चर्चा करताना संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने निवडणुकीत उतरलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. त्यासाठी भाजपा अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे ते त्यांना आमिषं दाखवणार, त्यांच्यावर दबाव आणणार. ज्यांच्यावर दबाव आणले जात आहेत, ते आमचे मित्र आहेत. तेही आम्हाला हे सांगत आहेत. ईडी, काही जुनी प्रकरणं उकरून काढून त्रास देण्याच्या भूमिका आहेत”

'भाजपचं चरित्र उघडं होतंय'

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ईडी, केंद्राच्या अखत्यारीतून नवी प्रकरणं काढली जात आहेत. भाजपचं चरित्र उघडं होतंय. महाराष्ट्रात असा प्रकारे निवडणूक लढवली जात असेल तर जनता पाहतेय. भाजपने असे पैसे एखाद्या सामाजिक कार्यात वापरावेत. बाकी गोष्टीसाठी मुख्यमंत्री समर्थ आहेत. मागील 50 वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. याचा अनुभव सर्वाधिक आम्हाला जास्त आहे. फक्त ईडी, सीबीआय तुमच्या हातात आहे असले तरी आमच्या हातात इतरही गोष्टी आहेत" असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

'भाजपने यात पैसा वाया घालवू नये'

भाजपने ईडी, सीबीआय किंवा इतर दवाब यंत्रणाचा वापर करून कितीही घोडेबाजारी केली, कितीही पैसा ओतला, तरी सहावी जागा महाविकास आघाडीच जिंकणार आहे. त्यामुळे भाजपने यात पैसा वाया घालवू नये, असा सल्ला देखील संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. दरम्यान, "कोणते अपक्ष आमदार कुणाच्या बाजूने आहेत, हे निवडणुकीच्या दिवशी कळेल, बहुजन विकास आघाडी, एमआयएम कुठे आहे, बच्चू कडू कुठे आहेत, शेतकरी संघटना कुठे आहेत हे १० जूनला कळेल”, असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT