Raju Shetti
Raju Shetti Saam Tv
महाराष्ट्र

Raju Shetti: कोल्हापुरात मुसळधार पावसात राजू शेट्टींचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन

सुमित सावंतसह, संभाजी थोरात साम टीव्ही

कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्यासाठी ट्विट करण्यापेक्षा जीआर काढावा, अशी मागणी माजी राजू शेट्टी यांनी केली. आज स्वाभिमानीचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी त्यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली.

कर्ज अनुदानाबरोबरच दिवसा वीज द्यावी, उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटणार आहे. त्यांना या मोर्चाचा फोटो दाखवतो. आज एका जिल्ह्यापुरता हा मोर्चा आहे. ही मागणी मान्य न झाल्यास राज्यात मोर्चे काढणार असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

आम्ही आता गप्प बसणार नाही. ५० हजार रुपये येत्या ९ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही झाले तर पुणे बेंगलोर हायवेवर जाणार आहे, असंही शेट्टी (Raju Shetti) म्हणाले. आज स्वाभिमानीच्या या आंदोलनाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकार घेतला होता. त्याप्रमाणे महाविकास आघाडीने शेवटच्या काही दिवसात ते पैसे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता.

या अनुदानाच्या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले. ही मागणी मान्य न झाल्यास राज्यभर मोठे आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे.

अनुदाना व्यतिरिक्त शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी मान्य करावी अशी मागणीही शेट्टी यांनी केली. हा मोर्चा एका जिल्ह्यासाठी नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यभरात मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. आज कोल्हापुरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाला आहे. मुसळधार पावसात राजू शेट्टी यांनी भाषण केले. यावेळी पावसात शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Criticized On Congress: ओबीसींच्या आरक्षणात कॉंग्रेसची बाधा; अमित शहांचा गंभीर आरोप

Dhule Constituency : धुळ्यातील काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर अखेर पडला पडदा, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेरांमुळे शाेभा बच्छाव यांची वाढली ताकद

T20 World Cup 2024: टीम इंडियाबाबत मोठी बातमी! हार्दिक पंड्याऐवजी या खेळाडूला मिळू शकते संधी

Beed Lok Sabha : बीड लोकसभेच्या रिंगणात आता ४१ उमेदवार; १४ उमेदवारांची माघार

Lok Sabha Election : काँग्रेसच्या अडचणी वाढणार? मनसेचा पंजा चिन्हावर आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

SCROLL FOR NEXT