राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय - एकनाथ शिंदे

गेल्या आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पावसाने धडाका घातला असून अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesaam tv
Published On

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पावसाने धडाका घातला असून अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांलड्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकराने (Maharashtra Government) नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे. राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत आहे. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Manukumar Srivastava) यांच्याशी चर्चा झाली असून त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Eknath Shinde
Maharashtra Rain Update: नेरळ रेल्वे स्थानकामध्ये पावसाचे पाणी घुसले

दरम्यान, गुरू पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दादर शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

Eknath Shinde
Pune Rain : पुण्यात पावसाचं रौद्ररूप; पुरामुळं पुलावर अडकला होता तरूण, थरारक Video पाहा

एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत.पण दुर्देवाने तशी वेळ आल्यास त्या ठिकाणी तात्काळ आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पोहचतील. आतापर्यंत ज्यांना स्थलांतरित केले आहे, त्यांना जेवण तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Edited By - Naresh shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com