raju shetti has no interest in mahayuti and mahavikas aghadi  saam Tv
महाराष्ट्र

Raju Shetti Political Decision : महायुती, महाविकासच्या चाचपणीपासून राजू शेट्टी दाेन हात लांब, राजकीय पटलावर एकला चलाे रे...

सध्याचे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचेही मोठ्या प्रमाणात साखर कारखाने असल्याने शेट्टी नेमका काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्यांसोबत जाण्याचा आपला कोणताही निर्णय सध्या तरी नाही असा सूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आळवला जाऊ लागला आहे. अर्थातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा हा निर्णय म्हणजे सध्या तरी राजकीय पटलावर एकला चलाे रे असाच म्हणावा लागेल. (Maharashtra News)

आज उद्धव ठाकरे पुन्हा एकदा कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा (hatkanangale lok sabha constituency) आढावा घेणार आहेत. तर ठाकरे गट हातकणंगलेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून कळते.

असं असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मात्र निवडणुकांपासून आणि जागा वाटपा पासून सध्या दूर आहेत. सध्याचे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचेही मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हे दोन्ही गट शेतकऱ्यांना विरोधात भूमिका घेत आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासोबत जाण्यास राजू शेट्टी उत्सुक दिसत नसल्याचं स्पष्ट होत आहे. शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्यांसोबत जाण्याचा आपला कोणताही निर्णय सध्या तरी नाही असेही स्वाभिमान शेतकरी संघटनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेट्टी यांची सध्या तरी राजकीय पटलावर एकला चलाे रे अशी भूमिका दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT