Raju Shetty Saam TV
महाराष्ट्र

Raju Shetti News : राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्ह्यात येण्यास बंदी, सोशल मीडिया वापराबाबतही दिले आदेश

संतप्त झालेल्या राजू शेट्टी यांनी म्हटलं की, अशा नोटीशींना मी भीक घालत नाही.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावरकर

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांना आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे. 31 मे पर्यंत ही बंदी असणार आहे. तसेच बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मीडियामध्ये पोस्ट, फोटो अथवा व्हिडीओ प्रदर्शित करण्याबाबतही बंदी घालण्यात आलेली आहे.

बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसांकडून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हाबंदीसोबतच बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मीडियामध्ये पोस्ट, फोटो अथवा व्हिडीओ पोस्ट करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.  (Latest Political News)

आंदोलन चिघळलं

बारसू प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी जबरदस्तीने जमिनी संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्ते बाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. याबाबत शेतकऱ्यांना आंदोलन छेडलं असता शेतकऱ्यांवर लाठीहल्ले, अश्रूधूरांचा वापर करून त्यांना सदर ठिकाणावरून हाकलून लावण्यात आले होते. यामुळे राज्य सरकार व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे.

राजू शेट्टी यांना ३१ मे अखेरपर्यंत जिल्हाबंदी

राजू शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उडी घेतली असून त्यांचे प्रतिनिधी त्याठिकाणी उपस्थित राहून सदर प्रकल्पास विरोध केलेला आहे. दरम्यान रत्नागिरी प्रशासनाने जिल्ह्यामध्ये ३१ मे अखेर राजू शेट्टी यांना जिल्हाबंदीची नोटीस लागू केली आहे. आदेशाचं उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.  (Latest Marathi News)

सरकार जनरल डायरप्रमाणे वागत आहे

संतप्त झालेल्या राजू शेट्टी यांनी अशा नोटीशींना मी भीक घालत नसून ज्या ठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्याठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे ऊभा राहणार असल्याचे सांगितले. लोकशाहीच्या राज्यामध्ये मानवी हक्कांवर गदा आणण्याचे काम सरकार करत असून राज्य सरकार जनरल डायरप्रमाणे वागू लागले आहे. काही मुठभर लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याची टिका राजू शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान काल रात्री उशिरा अप्पर जिल्हाधिकारी यांच्यावतीने व जिल्हा पोलिस प्रमुख यांचेवतीने रत्नागिरी पोलिस दलातील अधिकारी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जात त्यांना ही नोटीस लागू केली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये व विविध ठिकाणी हिंसक आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था बिघडविल्याचो कारण दाखवत सदर नोटीस लागू करण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT